परे आणि मरेवर नवे पादचारी पूल

 Mumbai
परे आणि मरेवर नवे पादचारी पूल

मुंबई - पश्चिम रेल्वेच्या सात स्थानकांवर पादचारी पूल बनवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. लोअर परेल, एलफिस्टन, गोरेगाव, वांद्रे, वसई, नालासोपारा, विरार या स्थानकांवर पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वेवरील धोकादायक अशा जुन्या पादचारी पुलांची दुरुस्ती करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. मध्य रेल्वेने मुंब्रा, भांडुप, दादर, दिवा स्थानकातील पादचारी पुलांची दुरूस्ती करण्याचा निर्णय घेतलाय. दादर आणि एलटीटी स्थानकाला सगळ्या प्लॅटफॉर्मशी जोडाणारा नवा पादचारी पुलही बनवण्यात येणार आहे. दिवसेंदिवस रेल्वे प्रवाशाची संख्या वाढत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून हा निर्यण घेण्यात आलाय.

Loading Comments