Advertisement

दीड वर्षात आठ पुलांची होणार दुरुस्ती

महालक्ष्मी येथील रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, दादर रेल्वे स्थानकावरील टिळक पूल यांसह आणखी आठ पुलांच्या दुरुस्तीचे काम लवकरच करण्यात येणार आहे.

दीड वर्षात आठ पुलांची होणार दुरुस्ती
SHARES

मागील वर्षी अंधेरी रेल्वे स्थानकातील गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासनानं मुंबईतील जीर्णावस्था झालेल्या पुलांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या दुर्घटनेनंतर मुंबईतील तब्बल ४४५ पूल, उड्डाणपुलांची पाहणी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार, नुकतंच लोअर परळ स्थानकातील डिलाईल रोड पुलाचं पाडकाम करण्यात आलं. त्यानंतर आता महालक्ष्मी येथील रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, दादर रेल्वे स्थानकावरील टिळक पूल यांसह आणखी आठ पुलांच्या दुरुस्तीचे काम लवकरच करण्यात येणार आहे.


१७ कोटी खर्च 

मुंबईतील ५० पुलांची अवस्था बिकट असून त्यापैकी काही पुलांची पाहणी रेल्वे व पालिकेनं केली आहे. यापैकी दादर रेल्वे स्थानकावरील टिळक पूल, महालक्ष्मी रेल्वे स्थानक येथील रेल्वे पूल, करी रोड रेल्वे स्थानक उड्डाणपूल, शीव रेल्वे स्थानक पूल, सायन रुग्णालयाजवळचा पूल, धारावी येथील रेल्वे उड्डाणपूल, माहीम फाटक येथील पादचारी पूल, दादर-धारावी नाल्यावरील पादचारी पूल या आठ महत्त्वाच्या पुलांच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. या पुलांच्या दुरूस्तीच्या कामासाठी १७ कोटी रुपये खर्च केरण्यात येणार आहेत. तसंच, येत्या दीड वर्षात दुरुस्ती पूर्ण करण्यात येणार आहे असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.


कॉम्प्युटर इंजिनीअर्सला कंत्राट 

या पुलांच्या दुरूस्तीच्या कामाच्या कंत्राटासाठी चार कंत्राटदारांनी निविदा भरल्या होत्या. त्यापैकी मे. कॉम्प्युटर इंजिनीअर्स या कंत्राटदाराला पुलाच्या दुरूस्तीचे कंत्राट देण्यात आले आहे. पुलांच्या दुरुस्ती प्रस्तावाला मंजुरी आणि कामांबाबत कार्यादेश मिळताच येत्या दीड वर्षात पुलांचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

सुव्रत-प्राजक्ताच्या आवाजात तामिळ गाणं

प्रवाशांकरीता मुंबई सेंट्रल स्थानकात ‘पॉड’ हॉटेलची निर्मिती



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा