Advertisement

रिक्षा, टॅक्सी पूर्ण क्षमतेने चालवायला परवानगी कधी?


रिक्षा, टॅक्सी पूर्ण क्षमतेने चालवायला परवानगी कधी?
SHARES

मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असताना राज्य सरकारनं एसटी, बेस्टला पूर्ण प्रवासी क्षमतेनं चालविण्याची परवानगी दिली. परंतु, काळ्या-पिवळ्या रिक्षा-टॅक्सींना मात्र अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळं रिक्षा व टॅक्सी चालकांचं उत्पन्न बुडत असल्याचा दावा, रिक्षा व टॅक्सी संघटनांनी केला आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे.


मुंबईत ४५ हजार काळ्या-पिवळ्या टॅक्सी आहेत. यामध्ये ३,५०० टॅक्सी ६ आसनी प्रवासी क्षमतेच्या आहेत, तर उर्वरित टॅक्सी ४ आसनी प्रवासी क्षमतेच्या आहेत. लॉकडाऊनपूर्वी पूर्ण प्रवासी क्षमतेनं धावणाऱ्या टॅक्सींवर कोरोनाकाळात र्निबध आले. परिणामी चालकांचे उत्पन्नच बुडाले. सुरुवातीच्या सव्वा महिन्यात रस्त्यावर टॅक्सी धावत नव्हत्या. केवळ एकच अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्याला घेऊन जाण्याची मुभा देताना चालकाचे उत्पन्न होत नव्हते. मे महिन्यात अत्यावश्यक सेवेतील २ कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली.


ऑगस्ट महिन्यात टॅक्सीतून एकूण ३ प्रवाशांना घेऊन जाण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर ३ महिने होत आले तरीही पूर्ण प्रवासी क्षमतेनं टॅक्सी चालवण्याची मंजुरी अद्यापही मिळाली नसल्याचं मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे महासचिव ए. एल. क्वाड्रोस यांनी स्पष्ट केलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय