Advertisement

एसटीच्या प्रवासी संख्येत ४०० टक्क्यांनी वाढ

२० ऑगस्टपासून आंतरजिल्हा प्रवासासाठी प्रवाशांची गर्दीही वाढू लागली आहे.

एसटीच्या प्रवासी संख्येत ४०० टक्क्यांनी वाढ
SHARES

मुंबईसह राज्यभरातील प्रवाशांना एसटीनं वाहतूक सेवा दिली जाते. परंतु, यंदा कोरोनामुळं ही सेवा सामान्यांसाठी बंद असून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरू होती. परंतु, हळुहळू ही सेवा आता सुरू झाली असून एसटीच्या आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी मिळाली. त्यानुसार, २० ऑगस्टपासून आंतरजिल्हा प्रवासासाठी प्रवाशांची गर्दीही वाढू लागली असून, मागील १८ दिवसांत प्रवासी संख्येत ४०० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

इ-पास रद्द झाल्यानं प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, दररोजच्या तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पनात ही २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यभरात दररोज सरासरी ५ लाख प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. आंतरजिल्हा प्रवासास परवानगी मिळण्यापूर्वी सामान्यांना प्रवासासाठी खाजगी वाहतुकीनं प्रवास करावा लागत होता. त्याशिवाय, एसटी बसेस केवळ आवश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठीच चालविल्या जात होत्या.

२० ऑगस्टपासून एसटीच्या आंतरजिल्हा प्रवासाला परवानगी मिळाली असून, तेव्हापासून ६ सप्टेंबरपर्यंत ८८ लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती महामंडळानं दिली. प्रवाशांच्या संख्येत आणि उत्पनात वाढ झाली असली तरी, अद्याप एसटी कर्मचाऱ्यांना मागील २ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा -

इमारतींमध्ये राबवली जाणार 'चेस द व्हायरस' मोहीम

महापालिका पुन्हा घेणार कोरोनाग्रस्तांचा शोध


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा