रेल्वे स्थानकांना फेरीवाल्यांचा विळखा

 Borivali
रेल्वे स्थानकांना फेरीवाल्यांचा विळखा
रेल्वे स्थानकांना फेरीवाल्यांचा विळखा
रेल्वे स्थानकांना फेरीवाल्यांचा विळखा
रेल्वे स्थानकांना फेरीवाल्यांचा विळखा
See all

बोरीवली - रेल्वे स्थानकांवर फेरीवाले दिसल्यास आरपीएफ (रेल्वे सुरक्षा बल) च्या वरीष्ठ पोलिसांचा एक दिवसाचा पगार कापण्याचे आदेश आरपीएफच्या आयुक्तांनी दिले होते. तरीही बोरीवली स्थानकाजवळ आणि पादचारी पुलावर फेरीवल्यांनी कब्जा केला आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर अवैध फेरीवाल्यांचं अतिक्रमण ही गंभीर समस्या होत चालली आहे. यामुळे रोज प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या मंडळाचे आरपीएफ आयुक्त अनुप कुमार शुक्ला यांनी याची दखल घेतली. त्यानंतर जर कोणत्याही रेल्वे स्थानकावर फेरीवाले दिसल्यास त्या ठिकाणी तैनात असलेल्या वरीष्ठ निरीक्षकांचा एक दिवसाचा पगार कापला जाईल असे आदेश जारी केले. मात्र यानंतरही बोरीवली रेल्वे स्थानक आणि पादचारी पुलावर फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत वांद्रे, अंधेरी आणि बोरीवली रेल्वे स्थानकावरील वरीष्ठ निरीक्षकांचा एक दिवसाचा पगार कापण्यात आला आहे.

Loading Comments