Advertisement

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना दिलासा, RT PCR चाचणीची सक्ती नाही

कोकणात येणार्‍या चाकरमान्यांना लशीच्या दोन मात्रा किंवा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली होती.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना दिलासा, RT PCR चाचणीची सक्ती नाही
SHARES

कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना लशीच्या दोन्ही मात्रा किंवा आरटीपीसीआर चाचणी सक्तीची नाही, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केलं आहे. तर, याबाबतची जबाबदारी संबंधित व्यक्ती आणि ग्रामकृती दलांवर टाकण्यात आली आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणार्‍या चाकरमान्यांना लशीच्या दोन मात्रा किंवा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. ग्रामीण भागातील ग्राम कृती दलांना त्यानुसार तपासणीच्या सूचना देखील करण्यात आल्या होत्या. त्यामुळे गावांमध्ये गोंधळ किंवा वाद होण्याची शक्यता होती.

रेल्वेस्थानकांवरही काही ठिकाणी आरटीपीसीआर किंवा अ‍ॅन्टीजेन चाचण्यांची व्यवस्था केली होती. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्‍वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत यांनी हा खुलासा केला.

दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात कोकणात चाकरमानी मोठ्या संख्येनं येतात. गेल्या वर्षी या काळात करोनाचा उद्रेक जास्त असल्यानं त्यांच्यासाठी १० दिवस विलगीकरणासह चाचणीचेही निर्बंध घालण्यात आले होते. यंदाच्या वर्षी मात्र करोनाचा प्रादूर्भाव लक्षणीय प्रमाणात कमी झाला असल्यामुळे त्याबाबत शिथिलता आली आहे.

सर्दी, खोकला किंवा ताप इत्यादी लक्षणे जाणवत असतील त्यांनी स्वत:हून काळजी घ्यावी. तसंच ग्राम कृती दलाला याची माहिती द्यावी, असं आवाहनही करण्यात आलं आहे. चाकरमान्यांनी स्वत:हून ग्रामस्थांसह कुटुंबीय सुरक्षित ठेवावं, असं आवाहन सामंत यांनी केलं आहे.हेही वाचा

'मोदी एक्सप्रेस' कोकणकडे रवाना

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोल माफ

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा