शाळेच्या बसची डिवायडरला धडक, मुले सुखरूप

Kandivali, Mumbai  -  

कांदिवली - येथील फ्लायओव्हरवर बुधवारी दुपारी 12.30 च्या आसपास शाळेच्या बसला अपघात झाला. या वेळी मुले बसमध्येच होती. सुदैवाने बसमधल्या कुठल्याही मुलाला गंभीर दुखापत झाली नाही. बस चालकही सुरक्षित आहे. अपघातानंतर मुलांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी अजून तरी चालकाविरोधात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

या अपघातात बसच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला. मालाड पश्चिम येथील विटी इंटरनॅशनल शाळेची ती बस होती. कांदिवली पूर्व येथील मुलांना घेऊन बस मालाडच्या दिशेने जात होती. त्यावेळी हा अपघात झाला. शाळेची बस वेगात होती. त्यामुळे ब्रीजवर येताच ती डिवायडरला आपटली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.

Loading Comments