आता सीएनजीवर चालणार स्कूटर

Mumbai
आता सीएनजीवर चालणार स्कूटर
आता सीएनजीवर चालणार स्कूटर
See all
मुंबई  -  

मुंबईत वाढते प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) ने स्कुटर चालवण्यासाठी उपयोगी पडणारे सीएनजी किट लॉन्च केला आहे. यामुळे प्रदूषण रोखण्यास नक्कीच मदत होईल.

या सीएनजी किटमध्ये 1.2 किलोग्राम वजनाची दोन सिलेंडर आहेत. ज्यामुळे आता स्कुटर 120 ते 130 प्रति किलोमीटर या वेगाने चालवण्यास मदत मिळेल. सीएनजी किट लावल्यानंतर प्रतिकिलोमीटरला 0.60 पैसे लागतील. म्हणजेच पेट्रोलपेक्षा खुपच कमी खर्च लागेल. महानगर गॅस लिमिटेड (एमजीएल) ने लोवाटो या कंपनीसोबत मिळून सीएनजी किट स्कुटर लॉन्च केला आहे. आतापर्यंत या सीएनजीचा वापर रिक्षा आणि इतर वाहनांमध्ये केला जात होता. पण आता स्कुटर लॉन्च केल्याने लवकरच सीएनजीवर चालणारे मोटार सायकल (बाईक) देखील पाहायला मिळेल.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.