Advertisement

डिसेंबरपासून धावणार दुसरी एसी लोकल?

रेल्वे प्रशासन दुसरी एसी लोकल ट्रॅकवर उतरवण्याचा विचार करत असून ही लोकल डिसेंबरपर्यंत पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात येईल, अशी अपेक्षा आहे. पश्चिम रेल्वेवर पहिली एसी लोकल नाताळच्या मुहूर्तावर धावली. यानंतर या लोकलचा विस्तार विरारपर्यंत करण्यात आला आहे. पण, अजूनही या एसी लोकलला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.

डिसेंबरपासून धावणार दुसरी एसी लोकल?
SHARES

प्रवाशांचा प्रवास गारेगार करणारी एकच एसी लोकल सध्या पश्चिम रेल्वेवर मार्गावर धावत आहे. पण, अजूनही या एसी लोकलला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. तरीही, या लोकलच्या फेऱ्या वाढवण्यासंबंधी प्रवाशांकडून सातत्याने सूचना केल्या जात आहेत. त्यानुसार, रेल्वे प्रशासन दुसरी एसी लोकल ट्रॅकवर उतरवण्याचा विचार करत असून ही लोकल डिसेंबरपर्यंत पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात येईल, अशी अपेक्षा आहे.


बोगीची बांधणी सुरू

आगामी एसी लोकलची चेन्नई (आयसीएफ) मधील फॅक्टरीमध्ये बांधणी होणार आहे. 'आयसीएफ'ने ३१ मार्चपर्यंत २ हजार ५०० बोगीची निर्मिती करण्याचं लक्ष्य निश्चित केलं असून जर्मन तंत्रज्ञानाच्या एलएचबी बोगीची निर्मिती सुरु करण्यात आल्याचं रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे.

पश्चिम रेल्वेवर पहिली एसी लोकल नाताळच्या मुहूर्तावर धावली. यानंतर या लोकलचा विस्तार विरारपर्यंत करण्यात आला आहे. पण, अजूनही या एसी लोकलला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.


पुढच्या वर्षात नवीन लोकल

रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच एसी लोकल बांधणीच्या ऑर्डर आयसीएफला दिल्या आहेत. त्यामुळेच, डिसेंबरमध्ये दुसरी एसी लोकल येणं अपेक्षित आहे. शिवाय, मार्च २०१९ पर्यत एकूण ८ ते १० वातानुकूलित लोकल सेवेत धावणार असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.


हेही वाचा-

'आॅन द स्पाॅट' तिकीट ! एसी लोकलच्या प्रवाशांना मिळणार डब्यातच सुविधा

एसी लोकलमध्ये लवकरच ‘हायर क्लास’ आणि ‘लोअर क्लास’?

आता एसी लोकलचं तिकीटही मिळणार मोबाईलवर!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा