Advertisement

'आॅन द स्पाॅट' तिकीट ! एसी लोकलच्या प्रवाशांना मिळणार डब्यातच सुविधा

एसी लोकलमधील प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वे एसी लोकलमधील तिकीट तपासनिसांना तिकीट मशीन उपलब्ध करून देणार आहे. त्यानुसार, या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बोगीतच तिकीट उपलब्ध होणार आहे.

'आॅन द स्पाॅट' तिकीट ! एसी लोकलच्या प्रवाशांना मिळणार डब्यातच सुविधा
SHARES

पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकलला अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने पश्चिम रेल्वेने शक्कल लढवत प्रवाशांना डब्यातच तिकीट देण्याचं ठरवलं आहे.

एसी लोकलमधील प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी पश्चिम रेल्वे एसी लोकलमधील तिकीट तपासनिसांना तिकीट मशीन उपलब्ध करून देणार आहे. त्यानुसार, या लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बोगीतच तिकीट उपलब्ध होणार आहे.


सध्याची स्थिती काय?

प्रवाशांचा प्रतिसाद मिळावा यासाठी फर्स्ट क्लास आणि मासिक पासधारक प्रवाशांना वातानुकूलित लोकलमध्ये प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, असा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला. त्यानुसार फर्स्ट क्लास तिकीट आणि पासधारकांना वातानुकूलित तिकीट व पास यामधील फरकाचे पैसे भरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. तरी देखील या लोकलला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.


काय आहे कारण?

प्रथम दर्जाचं तिकीट किंवा पास असणारे प्रवासी वगळता द्वितीय दर्जाचे प्रवासी अजूनही एसी लोकलकडे फिकरत नाही, असंच दिसून येत आहे. एसी लोकलचे दर प्रथम दर्जापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे, सामान्य प्रवासी एसी लोकलमधून प्रवास करतच नाही.


काय होईल फायदा?

सध्या पासधारकांना तिकीट खिडकीवरून एसीचं अतिरिक्त तिकीट काढावं लागतं. या मशिनमुळे मासिक पासधारकांना तिकीट फरकाचे पैसे देत बोगीत तिकीट मिळू शकणार आहे. यामुळे विनातिकीटाच्या दंडापासून प्रवाशांची सुटका होऊ शकेल.


असं असेल मशिन

क्रिसकडून २ ईटीएम म्हणजेच इलेक्ट्रिक तिकीट मशिन्स देण्यात आलेल्या आहेत. ६ इंचाची एक मशीन असेल. त्यासोबत एक छोटा प्रिंटरही देण्यात येणार आहे. तिकीट तपासणीस स्वत:च तिकीट त्यामधून देतील.

तिकीट मशिनसाठी रेल्वे सूचना प्रणाली केंद्रासोबत (क्रिस) करार करण्यात आला आहे. हातात वापरण्यात येणाऱ्या तिकीट मशिनची चाचणी यशस्वी झालेली आहे. पुढील आठवड्यात या मशीन उपलब्ध होणार आहेत.



हेही वाचा-

एसी लोकलमध्ये लवकरच ‘हायर क्लास’ आणि ‘लोअर क्लास’?

आता एसी लोकलचं तिकीटही मिळणार मोबाईलवर!



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा