Advertisement

आरेतील कलम १४४ हटवलं, तणाव निवळला

गोरेगाव पूर्वेकडील आरे काॅलनीतील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरातलं कलम १४४ मंगळवारी हटवण्यात आलं. त्यामुळे येथील पोलिस बंदोबस्त शिथील करण्यात आला असून जनजीवन सामान्य झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरेतील कलम १४४ हटवलं, तणाव निवळला
SHARES

गोरेगाव पूर्वेकडील आरे काॅलनीतील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरातलं कलम १४४ मंगळवारी हटवण्यात आलं. त्यामुळे येथील पोलिस बंदोबस्त शिथील करण्यात आला असून जनजीवन सामान्य झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

आंदोलकांना अटकाव

आरेतील मेट्रो कारशेड उभारण्यात येणाऱ्या परिसरातील झाडं कापल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शुक्रवारी रात्री पर्यावरणप्रेमी कारशेडच्या बाहेर विरोधासाठी जमले. कारशेडच्या जागी कोणालाही प्रवेश नसल्यामुळे अनेकांनी बाहेर रस्त्यावरच ठिय्या दिला.

२९ आंदोलनकर्त्यांना अटक

रात्रभर पोलीस आणि आंदोलकामध्ये घमसान झाल्याने ‘आरे’त तणावाचं वातावरण होतं. आंदोलन शांत करण्यासाठी या परिसरात भादंवि अंतर्गत कलम १४४ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या दरम्यान विविध पक्षांच्या नेत्यांसोबत, २९ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. 

मुंबई पोलिस प्रवक्तं प्रणय अशोक यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, ‘‘आरेतील तणाव निवळल्याने आरे कॉलनीतील कलम १४४ हटवण्यात आलं आहे. त्यामुळे येथील परिस्थिती आता पूर्वपदावर आली आहे.”


हेही वाचा-

आरेच्या आखाड्यात रोहीतची बॅटींग, मेट्रो प्रशासनाला सुनावलं

धक्कादायक वास्तव! २ दिवसांत आरेतील 'इतक्या' झाडांची कत्तल!!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा