मुंबई लोकल (मुंबई लोकल पश्चिम रेल्वे) ची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे आजही लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अंधेरी-जोगेश्वरी दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने दोन्ही मार्गांवर जलद लोकल फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.
आज सकाळच्या सुमारास हा बिघाड झाला होता. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने जलद वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू करण्यात आले. काही वेळेतच बिघाड दुरुस्त करण्यात आला.
मात्र, सकाळच्या वेळी हा बिघाड झाल्याने रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. या बिघाडाने लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पश्चिम रेल्वेची लोकल उशिराने धावत आहे. त्याच्या परिणामी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाल्याचे चित्र आहे.