Advertisement

सायन उड्डाणपूल दुरूस्तीच्या कामासाठी आजपासून बंद

दुरूस्तीच्या कामासाठी सायन उड्डाणपूल शुक्रवारपासून बंद राहणार आहे. शुक्रवारी पहाटे ५ वाजल्यापासून शीव उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे.

सायन उड्डाणपूल दुरूस्तीच्या कामासाठी आजपासून बंद
SHARES

दुरूस्तीच्या कामासाठी सायन उड्डाणपूल (sion flyover) शुक्रवारपासून बंद (closed) राहणार आहे. शुक्रवारी पहाटे ५ वाजल्यापासून सायन उड्डाणपुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. हे काम १७ फेब्रुवारी पहाटे ५ वाजेपर्यत सुरू राहणार आहे. या कालावधीत सायन उड्डाणपुलावरील वाहतूक (Transport) बंद राहणार आहे. 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने (Maharashtra State Roads Development Corporation) सायन उड्डाणपुलाचे (sion flyover)  बेअरिंग बदलण्याचे काम करण्यात येत आहे. शुक्रवारी पहाटे ५ वाजल्यापासून सुरुवात होणार असून १७ फेब्रुवारीपर्यंत पुलावरील वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. या कामामुळे उड्डाणपुलाखाली भागात वाहतुककोंडी होणार नाही यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष काळजी घेण्यात येणार आहे. बेअरिंग बदलण्यासाठी पुढील आठ आठवड्यांमधील प्रत्येकी चार दिवस सायन ड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या कामासाठी एकूण आठ ट्रॅफिक ब्लॉक मुंबई वाहतूक विभागाकडून मंजूर करण्यात आले आहे.  यापुढील ब्लॉक २० ते २४ फेब्रुवारी या कालावधीत असेल.

यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून प्रस्तावित होते. मात्र त्यामध्ये बदल करण्यात आला असून, पहाटे ५ वाजल्यापासून काम सुरू करण्यात आले.  ६ एप्रिलपर्यंत प्रत्येक आठवडय़ात शुक्रवारी रात्री १० वाजल्यापासून सोमवारी पहाटे ५ वाजेपर्यंत चार दिवस उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहील.


हेही वाचा-

कोस्टल रोडच्या कामात इको फ्रेंडली विटा

फास्टॅग आता फ्री, 'असे' मिळवा फास्टॅग
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय