Advertisement

कोस्टल रोडच्या कामात इको फ्रेंडली विटा

कांदीवली ते नरिमन पॉईंट या ३५ किमीच्या समुद्रातून जाणाऱ्या कोस्टल रोडच्या बांधकामासाठी आता काँक्रीटऐवजी पर्यावरणपूरक वीटा म्हणजेच इको ब्रीक्स (Echo Bricks) वापरल्या जाणार आहेत.

कोस्टल रोडच्या कामात इको फ्रेंडली विटा
SHARES

कोस्टल रोडला (Coastal road) पर्यावणप्रेमी आणि कोळी बांधवांनी मोठा विरोध केला आहे. समुद्री जीवांचं नुकसान होण्याची भिती असल्याने हा विरोध होत आहे. मात्र, मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) यावर आता उपाय शोधला आहे.  कांदीवली ते नरिमन पॉईंट या ३५ किमीच्या समुद्रातून जाणाऱ्या कोस्टल रोडच्या बांधकामासाठी आता काँक्रीटऐवजी पर्यावरणपूरक वीटा म्हणजेच इको ब्रीक्स (Echo Bricks) वापरल्या जाणार आहेत. इको ब्रीक्सच्या वापरानं समुद्री जीवांना कोणताही धोका निर्माण होणार नाही, असा दावा पालिकेने केला आहे.

पर्यावरणपूरक वीटा (Echo Bricks) लवकरच मुंबईत आणल्या जाणार आहेत.  यासाठी इस्त्रायलच्या (Israel) एका कंपनीला कंत्राट देण्यात येणार आहे. कांदिवली ते नरिमन पॉईंटपर्यंत कोस्टल रोडसाठी समुद्रात मोठ्या प्रमाणावर भराव टाकला जाणार आहे. कोस्टल रोड (Coastal road) साठीच्या काँक्रीटीकरणामुळे समुद्री जीव धोक्यात येण्याची तसंच माशांच्या अनेक प्रजाती धोक्यात येऊन कोळी बांधवांच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोस्टल रोडला पर्यावरणप्रेमी आणि कोळी बांधवांनी विरोध केला आहे. त्यामुळे महापालिकेने समुद्री जीवांचं नुकसान होऊ नये यासाठी पर्यावरणपूरक वीटा वापरण्याचा निर्णय घेतला आहे. 

महापालिका आयुक्तांच्या म्हणण्यानुसार या पर्यावरणपूरक वीटा  (Echo Bricks) कोस्टल रोड (Coastal road) साठी फार महाग ठरणार नाहीत. आदित्य ठाकरेंकडे महाविकास आघाडी सरकारमधलं पर्यावरण खातं आहे. तर दुसरीकडे कोस्टल रोड हा शिवसेनेसाठी ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्यामुळे, कोणत्याही वादाशिवाय हा प्रकल्प पूर्ण व्हावा ही शिवसेनेची इच्छा आहे. त्यासाठीच पर्यावरण प्रेमी आणि कोळी बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी आता पर्यावरणपूरक वीटांचा उतारा अवलंबला जात असल्याचं बोललं जात आहे. हेही वाचा -

५ डे वीक वरून मंत्र्यांमध्येच मतभेद

राजकीय उमेदवारांच्या गुन्ह्यांची माहिती जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा