अंधेरीत स्लॅब कोसळला, महिलेच्या डोक्यात पडले 27 टाके


  • अंधेरीत स्लॅब कोसळला, महिलेच्या डोक्यात पडले 27 टाके
  • अंधेरीत स्लॅब कोसळला, महिलेच्या डोक्यात पडले 27 टाके
SHARE

आत्तापर्यंत रेल्वेमुळे होणाऱ्या दुर्घटनेत प्रवासी गंभीर झाल्याचं ऐकिवात होतं. पण आता चक्क तिकीट केंद्रावर उभ्या असलेल्या एका प्रवासी महिलेच्या डोक्यात स्लॅबचा हिस्सा कोसळला. या प्रकारामुळे सदर महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या डोक्याला तब्बल 27 टाके पडले आहेत.घटना कुठली?

ही घटना आहे अंधेरीच्या रेल्वे स्थानक परिसरातली. तिकीट काढण्यासाठी आशा मोरेंचा मुलगा रांगेत उभा होता. त्या स्वत: दोघा भाच्यांसोबत बाजूला उभ्या होत्या. मात्र त्याचवेळी 56 वर्षीय आशा मोरेंच्या डोक्यात वरून स्लॅब कोसळला.


आशा मोरेंना कशी झाली जखम?

अचानक डोक्यात पडलेल्या स्लॅबमुळे आशा मोरे जागीच बेशुद्ध पडल्या. आसपासच्या लोकांनी लागलीच भानावर येत त्यांना रेल्वेच्या रूग्णवाहिकेतून कूपर रूग्णालयात दाखल केलं. आणि त्यांच्यावर तातडीने उपचारही सुरु झाले. यावेळी त्यांच्या एका भाच्यालाही पायाला दुखापत झाली.रेल्वे प्रशासनाने चोळले मीठ

दरम्यान, जखमी झालेल्या आशा मोरेंना दिलासा देण्याऐवजी रेल्वे प्रशासनाने मात्र असंवेदनशीलतेची हद्द पार केली. स्लॅब कोसळून 20 टाके पडलेल्या आशा मोरेंना रेल्वे प्रशासनाकडून अवघ्या 500 रूपयांची मदत करण्यात आली आहे. आता 500 रूपयांमध्ये उपचार कसे होणार असा सवाल आशा मोरेंच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.


आशा मोरे मुंबईहून त्यांच्या गावी वडोदराला रविवारी परत निघाल्या होत्या. मुलगा तिकीट काढायला गेला तेव्हा त्या दोघा भाच्यांसोबत बाजूला उभ्या होत्या. अचानक त्यांच्या डोक्यावर स्लॅब कोसळला. त्यांना 27 टाके पडले. 

विनोद म्हामूणकर, पोलिस हवालदारहेही वाचा

माहीम ते वांद्रे लोकलप्रवास ठरतोय जीवघेणा, मोबाइलचोर करताहेत प्रवाशांवर हल्ला


संबंधित विषय