कोयना एक्सप्रेससह अन्य ६ गाड्या ३० जानेवारीपर्यंत रद्द

मंकी हिल (Monkey Hill) ते कर्जत (Karjat) या घाटक्षेत्रात तांत्रिक तसंच देखभाल-दुरूस्तीची कामं मध्य रेल्वे (central railway) कडून केली जाणार आहेत. त्यामुळे अनेक एक्सप्रेससह काही पॅसेंजर गाड्या (Passenger trains) रद्द करण्यात आल्या आहेत.

SHARE

मंकी हिल (Monkey Hill) ते कर्जत (Karjat) या घाटक्षेत्रात तांत्रिक तसंच देखभाल-दुरूस्तीची कामं मध्य रेल्वे (central railway) कडून केली जाणार आहेत. त्यामुळे अनेक एक्सप्रेससह काही पॅसेंजर गाड्या (Passenger trains) रद्द करण्यात आल्या आहेत. १० दिवस ही देखभाल-दुरूस्तीची कामं चालणार आहेत. या कालावधीत मुंबई - कोल्हापूर कोयना एक्सप्रेस (Mumbai - Kolhapur Koyna Express) पुण्यातूनच सोडण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे, 

मुसळधार पावसामुळे घाट क्षेत्रातील रेल्वेमार्गाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात मंकी हिल (Monkey Hill) येथे दुरुस्तीचं काम केलं होतं. भर पावसातच मध्य रेल्वे (central railway) कडून दुरूस्तीची कामे करण्यात आली होती. त्यावेळीही काही गाड्या रद्द करण्यात केल्या होत्या. मात्र, मंकी हिल भागात आणखी कामं करणं आवश्यक आहे. त्यामुळे पुढील १० दिवस या भागात दुरूस्तीची कामं केली जाणार आहेत. त्यामुळे मुंबई-कोल्हापुर कोयना एक्सप्रेस अंशत: रद्द करण्यात आली आहे. यांसह सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-भुसावळ-पुणे ही गाडी दि. २१ ते ३१ जानेवारी या कालावधीत दौंड-मनमाडमार्गे धावेल.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या
पनवेल-पुणे-पनवेल पॅसेंजर ट्रेन ( २१ ते ३० जानेवारी)
सीएसएमटी-पंढरपूर पॅसेंजर (२३, २४, २५ आणि ३० जानेवारी)
पंढरपूर - सीएसएमटी पॅसेंजर ( २४, २५, २६ आणि ३१ जानेवारी)
सीएसएमटी-विजापूर पॅसेंजर ( २१, २२, २६ आणि २९ जानेवारी)
विजापूर-सीएसएमटी पॅसेंजर (२१ ते २३ आणि २७ ते ३० जानेवारी)
दौंड-साईनगर शिर्डी पॅसेंजर (२१ ते ३० जानेवारी) हेही वाचा -

'या' ४ लोकल सेवेतून बाद

बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक पोलिसांचा दणका, वर्षभरात ३४ हजार लायसन्स रद्द


संबंधित विषय
ताज्या बातम्या