Advertisement

विमानाप्रमाणे आता लोकल ट्रेनमध्येही येणार ब्लॅक बॉक्ससारखं तंत्रज्ञान

मुंबईतील उपनगरीय लोकलमध्ये विमानातील ब्लॅक बॉक्सप्रमाणेच ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवण्यात येणार आहे.

विमानाप्रमाणे आता लोकल ट्रेनमध्येही येणार ब्लॅक बॉक्ससारखं तंत्रज्ञान
(Representational Image)
SHARES

मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासन सतत प्रयत्न करत असतं. अशातच आता मुंबईतील उपनगरीय लोकलमध्ये विमानातील ब्लॅक बॉक्सप्रमाणेच ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवण्यात येणार आहे. मोटरमनच्या केबिनमध्ये ही प्रणाली बसवली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही मोठी बाब ठरली आहे.

लोकल ट्रेनसाठी आता आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय भारतीय रेल्वेनं घेतला आहे. त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात २.५ कोटींची तरतूद देखील करण्यात आली आहे. २०२२-२३च्या केंद्रीय अर्थसंकल्पात लोकल ट्रेनमधील या प्रणालीसाठी रेल्वे मंत्रालयाने आर्थिक निधीची तरतूद केली आहे.

यातून मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलमध्ये ही प्रणाली बसवण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. यासोबच लोकल ट्रेनच्या बाहेरच्या बाजूला देखील सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई विभागात पश्चिम रेल्वेनं आत्तापर्यंत २५ रेल्वेमध्ये ही प्रणाली बसवली आहे.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, 'इतर सर्व रेल्वेमध्ये येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत ही प्रणाली बसवण्याचं काम पूर्ण होईल', असं म्हटलं.

रेल्वेच्या बाहेरच्या बाजूला सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकलच्या फूटबोर्डवर उभ्या असणाऱ्या प्रवाशांकडील ऐवज हिसकावून घेण्याच्या घटना घडत असून अशा घटनांचा तपास करण्यासाठी या सीसीटीव्हींची मदत होईल, असं सांगण्यात आलं आहे.

हे सीसीटीव्ही कॅमेरे लोकल सुरू असतानाचे धक्के आणि कंपनांमध्ये देखील योग्यरीत्या व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकणारे असतील.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा