Advertisement

अंध प्रवाशांना जागा ओळखणं होणार सोपं

As the local trains have been started for the general public, visually impaired and disabled commuters can also travel from now. To ease the travel for visually impaired commuters a unique beep sound has been made to identify coaches.

अंध प्रवाशांना जागा ओळखणं होणार सोपं
SHARES

उपनगरी रेल्वेसेवेचा लाभ सर्वसामान्यांना घेण्याची मुभा देण्यात आल्यानंतर अंध प्रवाशांनी रेल्वेगाड्यांनी प्रवास केला. काहींनी सुखद प्रवास झाल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र प्रवास करण्याच्या मर्यादित वेळांमुळं प्रवासात अडचणी येत असल्याच्या प्रतिक्रिया अंध प्रवाशांनी दिल्या.

उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये अंध-अपंगांसाठी स्वतंत्र डबा आहे. त्यामुळं प्रवासात गर्दीचा त्रास सहन करावा लागत नाही. अंधांसाठीच्या डब्याची स्थानकातील जागा ओळखण्यासाठी एका विशिष्ट आवाजाची (बिप) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळं प्रवासातील मोठी चिंता मिटल्याची प्रतिक्रिया काही प्रवाशांनी दिली.

मागी १० महिने बसगाड्यांमधून प्रवास करताना विविध अडचणींना सामोरं जावं लागत होतं. विविध आकारांतील आणि उंचीच्या गाड्या बसथांब्यांवर येत असल्यानं रोज दरवाजे आणि बसगाड्यांच्या पायऱ्यांचा अंदाज अंधांना येत नव्हता. याशिवाय बसगाड्यांचा क्रमांक आणि ठिकाणांविषयीची माहिती सातत्यानं विचारावी लागत होती.

मुंबईत जीवनोपयोगी सामग्री खरेदी करण्यासाठी, पुस्तके घेण्यासाठी जावे लागते. लोकल सुरू झाल्यानं वाहतुकीचा खर्च आणि वेळही वाचला आहे. वेगवान प्रवास झाल्यानं कामं तातडीनं होत आहेत. मात्र, अपंग प्रवाशांसाठी उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये प्रवासाला पूर्ण वेळ देण्याची मागणी केली जात आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा