SHARE

येत्या २ ऑक्टोबर रोजी 'महात्मा गांधीजीं'च्या जयंतीनिमित्त मध्य रेल्वे मार्गावर एक विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. या लोकलवर स्वच्छता संदेशासह महात्मा गांधी यांचं छायाचित्र झळकणार आहे.


कशी रंगवली लोकल?

मध्य रेल्वेच्या कळवा येथील कारशेडमध्ये या विशेष लोकलवर तिरंग्याचे रंग रेखाटण्यात आलं जोडीला स्वच्छतेवरील जनजागृती संदेशही लिहिण्यात आले आहेत. या लोकलवरील रेखाटन आणि रंगकाम कारशेडमधील कर्मचाऱ्यांसह रेल्वेच्या कल्याण येथील शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांनी केलं आहे. मात्र, ही विशेष लोकल २ ऑक्टोबर रोजी कोणत्या मार्गावर चालवली जाणार? हे अद्याप ठरलेलं नाही.


कारण काय?

रेल्वे स्थानक आणि परिसरातील स्वच्छतेबाबत प्रवाशांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींचा विचार करून रेल्वे मंत्रालयाने २ ऑक्टोबर रोजी ही स्वच्छता लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या 'स्वच्छता हीच सेवा' या मोहिमेंतर्गत रेल्वे मंत्रालयानं लोकलप्रमाणेच मेल, एक्स्प्रेसमधील स्वच्छतेवर भर दिला आहे.हेही वाचा-

कल्याणच्या पत्री पुलाच्या पाडकामाला सुरुवात

मध्य रेल्वे मार्गावर आणखी २१० सीसीटीव्ही कॅमेरेसंबंधित विषय
ताज्या बातम्या