हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांवर विशेष घातपात तपासणी

 Mumbai

See all
Mumbai  -  

वडाळा रेल्वे पोलिसांच्या हद्दीतील सॅन्डहर्स्ट रोड आणि डॉकयार्ड रोड स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांच्या आदेशानुसार मंगळवारी विशेष घातपात तपासणी करण्यात आली. वारंवार मिळणाऱ्या धमक्यांच्या अनुषंगाने वडाळा रेल्वे पोलिसांनी ही विशेष मोहीम राबवली.

यावेळी स्थानकांवरील अडगळीच्या जागा, तिकीट बुकिंग ऑफिस, पादचारी पुलाखालील जागा, उपहार गृह, लोहमार्ग हद्दीतील संपूर्ण जागेची काटेकोरपणे तपासणी करण्यात आली.

घाटकोपर येथील बीडीबीएस आणि डॉग स्कॉड पथकासह डॉग-ब्रुनो, हँडलर माने, पोलीस नाईक सतीश जाधव, बापू मराठे यांच्या मदतीने ही विशेष घातपात तपासणी करण्यात आली. यावेळी सॅन्डहर्स्ट रोड स्टेशन व्यवस्थापक रामेश्वर मीना, पोलीस हवालदार मंगेश साळवी, राजेंद्र बाबर, विष्णू कांबळे यांच्यासह रेल्वे पोलिसांचे पथक होते.

Loading Comments