Advertisement

कोकणवासीयांसाठी बोरिवली मार्गे विशेष गाडी सोडण्यास मान्यता द्या- गोपाळ शेट्टी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था करावी अशी, मागणी मागील अनेक दिवसांपासून स्थानिक नेत, प्रवासी करत आहेत.

कोकणवासीयांसाठी बोरिवली मार्गे विशेष गाडी सोडण्यास मान्यता द्या- गोपाळ शेट्टी
SHARES

दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. कोकणातील गणेशोत्सव म्हणजे वेगळीच मजा. परंतु, यंदा राज्यावर कोरोनाचं संकट आल्यानं लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळं कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना यंदा घरूनच बाप्पाला पाया पडावा लागणार का? ही चिंता सतावत आहे. दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था करावी अशी, मागणी मागील अनेक दिवसांपासून स्थानिक नेत, प्रवासी करत आहेत. अशातच नियमांचे पालन करून कोकणवासीयांसाठी बोरिवली, वसई, दिवा, पनवेल अशी विशेष गाडी सोडण्यात यावी, अशी आग्रही मागणी उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना केली होती.

कोकण रेल्वे मार्गावर अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्र्यासोबत खासदार गोपाळ शेट्टी यांची व्हर्च्युल बैठक नुकतीच झाली होती. या सूचनेला मान्यता देत जर महाराष्ट्र शासनानं सदर विशेष गाडी सोडण्याची मागणी केल्यास केंद्र सरकारतर्फे गाडी सोडण्यास मान्यता देण्यात येईल असं आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी यावेळी दिल्याचं समजतं. त्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणपतीसाठी बोरिवली मार्गे विशेष गाडी सोडण्यास मान्यता द्यावी, अशी आग्रही मागणी खासदार गोपाळ शेट्टी यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केली आहे.

जेणेकरून कोकणवासीय मराठी प्रेमी नागरिकांना आपल्या गावी गणेशोत्सव साजरा करता येईल असे देखिल त्यांनी पत्रात नमूद केले आहे.आहे.यासंदर्भात चक्क मराठी भाषेत व्हिडिओ देखिल त्यांनी जारी केला आहे. गणेशोत्सवाला अवघा १ महिना शिल्लक राहिला असून, गणेश भक्त कोकणात जाण्याची तयारी करत आहेत. मात्र, कोरोनामुळं त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

या बैठकीत झालेल्या चर्चेप्रमाणे वसई बाय पास व्हाया पनवेल, दिवा, रोहा, महाड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, सावंतवाडी, गोवा मार्गे   कर्नाटक, केरळ मार्गे जाणारी कोकण रेल्वे गाडी सोडावी अशी मागणी आपण  २०१५ पासून केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडं सातत्यानं केली आहे.



हेही वाचा -

Online School: बालवाडी ते १२ वी ‘असा’ होईल अभ्यास, आॅनलाईन वर्गांचं वेळापत्रक जाहीर

Lower Parel Bridge लोअर परळ पुलाचं काम २०२१ पर्यंत होणार पूर्ण



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा