Advertisement

महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष लोकल धावणार, 'हे' आहे वेळापत्रक

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन करता येणार आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष लोकल धावणार, 'हे' आहे वेळापत्रक
SHARES

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन करता येणार आहे.

यानिमित्त ६ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पनवेल स्थानकांदरम्यान मध्य रेल्वे प्रवाशांकरीता ८ उपनगरीय विशेष गाड्या (Mumbai Local) चालवण्यात येणार आहेत.

विशेष लोकलचं वेळापत्रक

१) मेन लाईन - अप विशेष

  • कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - विशेष कल्याण इथून १ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे २.३० वाजता पोहोचेल.
  • कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण इथून २.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे ३.४५ वाजता पोहोचेल.

२) मेन लाईन - डाउन विशेष

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून १.३० वाजता सुटेल आणि कल्याण इथे ३.०० वाजता पोहोचेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून २.३० वाजता सुटेल आणि कल्याण इथे ४ वाजता पोहोचेल.

३) हार्बर लाइन - अप विशेष

  • पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल इथून १.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे २.३० वाजता पोहोचेल. 
  • पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल इथून २.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे ३.५० वाजता पोहोचेल.

४) हार्बर लाइन - डाउन विशेष

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून १.४० वाजता सुटेल आणि पनवेल इथे ३.०० वाजता पोहोचेल. 
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून २.४० वाजता सुटेल आणि पनवेल इथे ४.०० वाजता पोहोचेल.

या ट्रेन्स स्लो असून सगळ्या स्थानकांवर थांबणार. फक्त प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढताना, प्रवास करताना आणि उतरताना कोविड-19 नियमांचे पालन करावं, असं आवाहन रेल्वं प्रशासनानं केलं आहे.



हेही वाचा

वाहतूक नियमांचं उल्लंघन करताय? भरावा लागेल 'इतका' दंड

मुंबई-अलिबाग जलवाहतूक ३ दिवस बंद; प्रवाशांना मोठा मनस्ताप

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा