Advertisement

काळी-पिवळी टॅक्सीचा वेग मंदावणार


काळी-पिवळी टॅक्सीचा वेग मंदावणार
SHARES

राज्य सरकारने काळी-पिवळी टॅक्सी, ओला कॅब आणि 3500 किलोपेक्षा कमी वजनाच्या वाहनांवर वेग मर्यादा उपकरण (स्पीड लिमिट डिव्हाइस) लावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे वाहनांची वेगमर्यादा कमाल 80 किलोमीटर प्रतितास निश्चित करण्यात आली आहे. राज्य सरकारने काढलेल्या सूचनेनुसार सर्व वाहनांवर स्पीड लिमिट डिव्हाइस लावणे बंधनकारक असणार आहे. त्यासाठी जवळपास 15 ते 20 हजारांचा खर्च येईल. यापूर्वी केंद्र सरकारने सर्व अवजड वाहनांसह सर्वसामान्य वाहनांवर अशा प्रकारे स्पीड लिमिट डिव्हाइस लावण्याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य सरकारने आता यामध्ये फक्त सर्वसाधारण वाहनांवर स्पीड लिमिट डिव्हाइस लावण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे आता मर्यादा उपकरण न लावणाऱ्या वाहनांचे परवाने रद्द केले जातील. सरकारच्या या निर्णयाचे अनेक प्रवाशांनी स्वागत केले आहे. पण यामुळे टॅक्सी युनियन संघटनेसह अनेक टॅक्सी चालक नाराज झाले आहेत.

स्पीड डिव्हाईस तयार करणाऱ्या कंपनीच्या फायद्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप मुंबई टॅक्सीमॅन युनियनचे नेते ए. एल. क्वॉड्रोस यांनी केला आहे. फक्त कंपनीच्या फायद्यासाठी अशा प्रकारचा नियम टॅक्सीचालकांवर लादला जात असल्याचे क्वॉड्रस म्हणाले. गुरुवारी आरटीओने स्पीड मर्यादा उपकरण लावण्याची अट घालत 300 टॅक्सीचालकांचे फिटनेस नुतनीकरण प्रमाणपत्र मंजूर न करताच परत पाठवल्याची माहिती क्वड्रोस यांनी दिली.

आता 300 टॅक्सीचालकांना सरकार रस्त्यावर आणण्याच्या तयारीत आहे. कारण टॅक्सीची किंमत 17 हजार असताना 15 हजारांचे वेग मर्यादा उपकरण बसवणार कसे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

याविरोधात आता टॅक्सी युनियन संघटना सोमवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे समजते. येत्या काळात टॅक्सीचालक सरकारलाही घेराव घालण्याची शक्यता आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा