Advertisement

दिल्ली मुंबई प्रवासासाठी स्पाईसजेटची अतिरिक्त उड्डाणं

दिल्ली-मुंबई विमान प्रवास करणाऱ्यांसाठी स्पाईसजेटनं एक खुषखबर दिली आहे. मुंबई दिल्ली दरम्यान स्पाईसजेट दररोज अतिरिक्त उड्डाणं सुरू करण्याची योजना तयार केली आहे.

दिल्ली मुंबई प्रवासासाठी स्पाईसजेटची अतिरिक्त उड्डाणं
SHARES

दिल्ली-मुंबई विमान प्रवास करणाऱ्यांसाठी स्पाईसजेटनं एक खुषखबर दिली आहे. मुंबई दिल्ली दरम्यान स्पाईसजेट दररोज अतिरिक्त उड्डाणं सुरू करण्याची योजना तयार केली आहे. यासाठी स्पाईसजेटच्या काही उड्डाणांना टर्मिनल T-2 वर स्थानांतरीत करण्यात येणार आहे.


आजपासून उड्डाण

२६ एप्रिलापासून दिल्ली आतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल T-2 वरून एसजी – ८००० आणि एसजी – ८९९९ या विमानांचं उड्डाण करण्यात येणार आहे. तसंच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल T-2 वरून एसजी - ६००० आणि एसजी – ६९९९ या विमानांचं उड्डाण होणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी स्पाईसजेटनं प्रवाशांना विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच आपल्या विमानाचा क्रमांक आणि टर्मिनलची माहिती घेण्यास सांगितली आहे.

यापूर्वीच २६ एप्रिलपासून मुंबई दिल्ली आणि देशांतर्गत २८ अतिरिक्त उड्डाणं सुरू करण्याची घोषणा केली होती. यापैकी १४ उड्डाणं मुंबईशी, ८ दिल्लीशी आणि २ अन्य शहरांसाठी सुरू करण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त स्पाईस जेट मे महिन्यापासून हाँकाँग, जेद्दाह, दुबई, कोलंबो, ढाका, रियाध, बँकॉक आणि काठमांडू या ठिकाणांकरिता थेट उड्डाणं सुरू करणार आहे.




हेही वाचा -

अनारक्षित रेल्वे प्रवासासाठी आता ‘बायोमेट्रिक टोकन’



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा