Advertisement

स्पाइसजेटची ११ मे पासून मुंबई-दिल्लीतून नवीन १२ उड्डाणे

एप्रिलपासून आतापर्यंत स्पाइसजेटने नवीन ७७ उड्डाणे सुरू केली आहेत. मागील महिन्यात जेट एअरवेज बंद पडल्यानंतर उड्डाणांचा होणारा तुटवडा भरून काढण्याचं स्पाइसजेटला सांगण्यात आलं होतं.

स्पाइसजेटची ११ मे पासून मुंबई-दिल्लीतून नवीन १२ उड्डाणे
SHARES

विमान कंपनी स्पाइसजेटने मुंबई आणि नवी दिल्लीतून १२ नवीन उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही नवी उड्डाणे ११ मे पासून सुरू होणार आहेत. यामधील ६ उड्डाणे मुंबईमधून तर ५ उड्डाणे दिल्लीतून होणार असल्याचं स्पाइसजेटने सांगितलं आहे. बोइंग ७३७ एनजी विमानांनी हा नवीन प्रवास सुरू होणार आहे. तर मुंबई विमानतळावरील टर्मिनल २ नवीन उड्डाणे होतील. 


नवीन ७७ उड्डाणे 

एप्रिलपासून आतापर्यंत स्पाइसजेटने नवीन ७७ उड्डाणे सुरू केली आहेत. मागील महिन्यात जेट एअरवेज बंद पडल्यानंतर उड्डाणांचा होणारा तुटवडा भरून काढण्याचं  स्पाइसजेटला सांगण्यात आलं होतं. स्पाइसजेटने याआधी गुरूवारी मुंबईतून अन्य शहरांना जोडणाऱ्या १९ नवीन उड्डाणांची घोषणा केली होती. ही नवीन उड्डाणे ४ मे पासून सुरू होणार आहेत. 


४ वेळा विस्तार

जेट एअरवेजचं कामकाज ठप्प झाल्यानंतर मागील एका महिन्यात स्पाइसजेटने ४ वेळा आपल्या सेवेचा विस्तार केला आहे. स्पाइसजेटने म्हटलं आहे की, १ एप्रिलपासून कंपनीने ७७ नवीन उड्डाणे सुरू केली आहेत. यातील ४० उड्डाणे मुंबई आणि १० उड्डाणे दिल्लीला जोडणारी आहेत. तर दिल्ली ते मुंबई ८ नवीन उड्डाणे सुरू केली आहेत. 



हेही वाचा -

परिवहन विभागाला ३५० कोटींचं टार्गेट

मुंबई-पुणे, मुंबई-मडगाव प्रवास होणार आणखी वेगानं




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा