Advertisement

बंदमुळे कोकणात जाणाऱ्या जादा एसटी तीननंतर सुटणार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणासाठी मुंबई आणि ठाण्यातून ज्या ३५० जादा एसटी गाड्या सोडण्याच्या निर्णयावर एसटी महामंडळ ठाम आहे. सोमवारच्या बंदच्या पार्श्वभूमीवर एसटीची दैनंदिन वाहतूक व्यवस्था सुरू राहीलंच पण त्याचवेळी कोकणासाठीच्या जादा बसगाड्याही सोडल्या जातील.

बंदमुळे कोकणात जाणाऱ्या जादा एसटी तीननंतर सुटणार
SHARES

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून गणेशभक्त आता मोठ्या संख्येनं कोकणाकडे धाव घेत आहेत. एसटी, रेल्वेनं गणेशभक्त कोकण गाठण्याच्या तयारी असतानाच या गणेशभक्तांसमोर एक मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही अडचण म्हणजे सोमवारच्या भारत बंदची. 

इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसनं १० सप्टेंबरला, सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे.  बंदच्या वेळी एसटी गाड्यांना लक्ष केलं जात असल्यानं एसटी गाड्या बंद राहणार नाहीत ना, गणेशोत्सवासाठी सोडलेल्या जादा बसेस सोडल्या जातील ना असा प्रश्न गणेशभक्तांना पडला असेल.  पण या गणेशभक्तांच्या हाकेला अखेर एसटी महामंडळ धावून आलं आहे.


सोमवारी ३५० जादा एसटी 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणासाठी मुंबई आणि ठाण्यातून ज्या ३५० जादा एसटी गाड्या सोडण्याच्या निर्णयावर एसटी महामंडळ ठाम आहे. सोमवारच्या बंदच्या पार्श्वभूमीवर एसटीची दैनंदिन वाहतूक व्यवस्था सुरू राहीलंच पण त्याचवेळी कोकणासाठीच्या जादा बसगाड्याही सोडल्या जातील. मात्र, या जादा गाड्या सकाळी नव्हे तर दुपारी ३ वाजल्यानंतर सोडल्या जातील, अशी घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. त्यामुळं सोमवारी कोकणाकडे निघालेल्या गणेशभक्तांनी याची नोंद घेत दुपारनंतर प्रवास करावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

२२२५ जादा गाड्या

गणेशोत्सवासाठी कोकणातल्या विविध ठिकाणी जाणाऱ्या गणेशभक्तांची संख्या लक्षात घेता एसटी  तब्बल २२२५ जादा गाड्या ८ सप्टेंबर ते १२ सप्टेंबरदरम्यान सोडणार अाहेत. यातील ३५० गाड्या मुंबई आणि ठाण्यातून सोमवारी १० सप्टेंबरला सुटणार आहेत. सकाळपासून वेळापत्रकानुसार या गाड्या सुटणार होत्या. मात्र आता या गाड्या सकाळी नाही तर दुपारी ३ वाजल्यानंतर मुंबई आणि ठाण्यातील सर्व एसटी डेपोतून सोडण्यात येणार आहेत, असं एसटीकडून जाहीर करण्यात आलं आहे. भारत बंदच्या धर्तीवर गणेशभक्ताच्या सुरक्षेच्यादृष्टीनं सकाळएेवजी दुपारनंतर जादा एसटी गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आहे. 



हेही वाचा -

मुंबईत सेव्हन स्टार क्रूझचं आगमन, परदेशी पाहुण्यांचा ३ दिवस मुक्काम

माऊंट मेरीच्या जत्रेसाठी बेस्टच्या जादा बसगाड्या





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा