Advertisement

भाडेतत्त्वावरील नव्या शिवशाहीवर एसटीचे चालक


भाडेतत्त्वावरील नव्या शिवशाहीवर एसटीचे चालक
SHARES

एसटी महामंडळाने २ हजार वातानुकूलित शिवशाही बसगाड्या ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणं भाडेतत्वावरील नव्या शिवशाही बसगाड्यांवर एसटीचेच चालक नेमण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. शिवशाही बसगाड्यांचे अपघात आणि चालकांबाबत सतत येणाऱ्या तक्रारींचा विचार करून महामंडळानं हा निर्णय घेतला आहे. 


अपघातांची दखल

शिवशाही बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर त्यांच्या अपघात, चालकांची वागणूक याबाबतच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्रवाशांकडून येत होत्या. आतापर्यंत जितक्या शिवशाही बसगाड्यांचे अपघात झाले यामध्ये एसटी महामंडळाच्या मालकी हक्काच्या गाड्यांचा अाणि  भाडेतत्त्वावरील गाड्यांचा समावेश अाहे. त्यामुळे एसटी महामंडळानं या अपघातांची दखल घेऊन उपाययोजना करण्याचा निर्णय घेत चालक व यांत्रिकी विभागांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.


बस चालवताना अडचणी

एसटी महामंडळानं आतापर्यंत २८३ अधिकारी, १,११२ यांत्रिकी कर्मचारी आणि ८७८ चालकांना प्रक्षिक्षण दिले आहे. शिवशाही वाहनांची लांबी, उंची, वजन, वाहनाची पुढील बाजू जास्त असून वाहनाच्या बॉडीचे जमिनीपासूनचे अंतर कमी असल्यामुळं चालकांना बस चालविताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.


मार्च २०१९ पर्यंत दाखल

 भाडेतत्त्वावरील एक हजार नव्या शिवशाही बस मार्च २०१९ पर्यंत सेवेत दाखल करण्यासाठी एसटी महामंडळ प्रयत्न करीत आहे. या नव्या एक हजार बसमधील ५०० बस एसटीच्या मालकीच्या आहेत. उर्वरित १,५०० बसगाड्या या भाडेतत्त्वावरील आहेत. मार्च, २०१८ पर्यंत पहिल्या टप्प्यात १,२०० शिवशाही बस येणार होत्या. त्यानुसार एसटी महामंडळाच्या ताफ्यात  आतापर्यंत ९९८ शिवशाही बस दाखल झाल्या आहेत. यामध्ये एसटीच्या मालकीच्या सर्व शिवशाही बसगाड्या दाखल झाल्या आहेत.हेही वाचा - 

नव्या एसी लोकलसाठी आणखी प्रतीक्षा!

मुंबईतील सर्व लोकल होणार १५ डब्यांच्या!
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा