Advertisement

खाजगी चालकांच्या मदतीनं शिवनेरी बस सेवा सुरू, ST आंदोलक संतप्त

संपात फूट पाडण्यासाठी शिवनेरी सुरू केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

खाजगी चालकांच्या मदतीनं शिवनेरी बस सेवा सुरू, ST आंदोलक संतप्त
SHARES

एसटी महामंडळानं शिवनेरी बसेसची सेवा नाशिकमधून सुरू केली आहे. शिवनेरी बसवर खासगी चालकांची ड्युटी लावून बस नाशिकवरून पुणे, मुंबईसाठी रवाना करण्यात आल्या आहेत.

संपात फूट पाडण्यासाठी शिवनेरी सुरू केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. तसंच शिवनेरी बसेसवरील एसटी महामंडळाचा लोगो काढण्याची मागणी देखील कर्मचाऱ्यांनी केली आहे. एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करा, या मागणीवर कर्मचारी अजूनही ठाम आहेत. तर न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही सुरु असल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे.

दरम्यान संपकऱ्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या अवमान याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालय काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे.

तर तिकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देणाऱ्या भाजप नेत्यांवर परिवहन मंत्री अनिल परब यांनी गंभीर आरोप केलेत. काही कामगारांना कामावर रुजू व्हायचंय मात्र त्यांची अडवणूक सुरू असल्याचा दावा अनिल परब यांनी केलाय.

तसंच संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर परतावं असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलंय. काही कामगारांना कामावर यायचं आहे मात्र त्यांना भाजपचे लोक कामावर येऊ देत नसल्याचा आरोप अनिल परब यांनी केलाय.हेही वाचा

संप मागे घ्या, अन्यथा...; एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा इशारा

गाडी चालवताय पण पीयूसी नाही; होऊ शकतो १० हजारांचा दंड

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा