Advertisement

वारकऱ्यांच्या हाती एसटीचं स्टेअरिंग; चालक भरतीत वारकरी उमेदवारांना प्राधान्य

सध्या एसटीमध्ये ३५०० चालकांची कमतरता आहे. एसटी महांमडळात १८ हजार बसेस असून चालकांची संख्या सुमारे ३५ हजार आहे. चालकांच्या भरतीत वारकरी उमेदवारांना प्राधान्य देण्याची संकल्पना परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांची अाहे.

वारकऱ्यांच्या हाती एसटीचं स्टेअरिंग; चालक भरतीत वारकरी उमेदवारांना प्राधान्य
SHARES

एसटी महामंडळ चालकांच्या नवीन भरतीसाठी वारकरी उमेदवारांना प्राधान्य देण्याचा विचार करत आहे. एसटी बसचे चालक एसटी चालवत असताना व्यसन करतात. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढते. तर अध्यात्म आणि संसाराचा मेळ चांगल्या रितीने बसवण्याची शिकवण घेत असताना वारकऱ्यांना व्यसनांची गरज भासत नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वारकरी संप्रदायातील उमेदवारांना चालक भरतीमध्ये आरक्षण देण्याचा विचार एसटी महामंडळ करत आहे.


रावते यांची संकल्पना

एसटी महामंडळात सतत भरती प्रक्रिया राबवूनही चालकांची कमतरता जाणवते. सध्या एसटीमध्ये ३५०० चालकांची कमतरता आहे. एसटी महांमडळात १८ हजार बसेस असून चालकांची संख्या सुमारे ३५ हजार आहे. चालकांच्या भरतीत वारकरी उमेदवारांना प्राधान्य देण्याची संकल्पना परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांची अाहे. यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ही भरती केली जाईल. 


मद्यपी चालक

 एसटी बस चालवत असताना चालक तोंडात तंबाखू ठेवतात. ड्युटी संपल्यावर मद्यपान करणाऱ्या चालकांविषयी त्यांच्या कुटुंबीयांकडून नेहमी तक्रारी येत असतात. यासाठी व्यसनांपासून मुक्त असणारे उमेदवार सेवेत समाविष्ट करून घेण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे.हेही वाचा- 

मध्य रेल्वे मार्गावर आणखी २१० सीसीटीव्ही कॅमेरे

पश्चिम द्रूतगती मार्ग होणार सिग्नल फ्री
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा