Advertisement

दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द


दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
SHARES

दिवाळीत बॅंक कर्मचारी, शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करत असतातना एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मात्र त्यांच्या कुटुंबीयांसोबत यंदाची दिवाळी साजरी करता येणार नाही. कारण एसटी महामंडळाने दिवाळीतील प्रवासी वाहतूक लक्षात घेऊन कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.


म्हणून सुट्ट्या रद्द

एसटी महामंडळाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार २९ ऑक्टोबरपासून दिवाळी हंगाम संपेपर्यंत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. दिवाळी हंगामात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते.

गेल्या वर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या काळात संप पुकारला होता. या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. त्यामुळे एसटी महामंडळाने यंदा कर्मचारी संघटनांच्या उपोषण, आंदोलनाच्या इशाऱ्याची गंभीर दखल घेतली आहे. त्यानुसार महामंडळाने दिवाळी हंगाम संपेपर्यंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा