'वसई-विरार भागातील एसटी फेऱ्या सुरू करा' : उच्च न्यायालय

  Mumbai
  'वसई-विरार भागातील एसटी फेऱ्या सुरू करा' : उच्च न्यायालय
  मुंबई  -  

  वसई विरार भागातील एसटी फेऱ्या सुरू करा, अन्यथा पर्यायी व्यवस्थेचा विचार करा असे निर्देश शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने वसई-विरार महापालिका आणि एसटी महामंडळाला दिले आहेत. वसई-विरार महापालिकेकडून हा मुद्दा सुटत नसल्याने राज्य सरकारने यात जातीनं लक्ष घालून लवकरात लवकर वसई-विरार भागात रुट नंबर 21 वर बस सेवा, एसटी सेवा सुरू करावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पालिकेनं या मार्गावर बससेवा सुरू करण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र, या बसेस डेपोत उभ्या करू देण्यास एसटी महामंडळाची परवानगी नसल्याचं पालिकेनं न्यायालयाला कळवलं.

  परीक्षा काळात विद्यार्थ्यांचे आणखी हाल करू नका, असे खडेबोल सुनावत न्यायालयाने एसटी महामंडळ आणि वसई-विरार महानगरपालिकेला 4 मेपर्यंत सामंजस्यानं यातून मार्ग काढण्याचे निर्देश दिले आहेत. सेवा तोट्यात असल्यामुळे एसटी महामंडळानं 31 मार्चपासून वसई-विरार येथील काही फेऱ्या बंद करणार असल्याचं जाहीर केलं होतं. महामंडळाच्या या निर्णयाविरोधात वसईतील 12 वर्षीय शाळकरी मुलाने त्याच्या शिक्षकांसोबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.