Advertisement

कोरोनाकाळात एसटीच्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या

दिवसरात्र या कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देणाऱ्या या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर सध्या आर्थिक संकट ओढावलं आहे.

कोरोनाकाळात एसटीच्या 'इतक्या' कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या
SHARES

गतवर्षी मुंबईसह राज्यभरात कोरोना या जीवघेण्या व्हायरसनं धुमाकुळ घातला होता. परिणामी अनेक जाणांना आपला या व्हायरसमुळं जीव गमवावा लागला. शिवाय, नागरिकांच्या सुरक्षेसाठी लॉकडाऊन करण्यात आलं होतं. यावेळी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यावेळी या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळानं वाहतूक सेवा दिली होती. दिवसरात्र या कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा देणाऱ्या या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांवर सध्या आर्थिक संकट ओढावलं आहे. परिणामी एसटीच्या अनेक कर्मचाऱ्यांनी आर्थिक संकटामुळं आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

कमी वेतन व अन्य आर्थिक समस्यांमुळे मार्च २०२० पासून आतापर्यंत राज्यात २३ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एसटी महामंडळाकडून ही माहिती देण्यात आली. यात १३ चालक असून त्यानंतर वाहक व विविध विभागांतील कर्मचारी आहेत. कोरोनामुळे मार्च २०२० पासून टाळेबंदी लागली आणि महामंडळाच्या वाहतुकीवरही निर्बंध आले. त्यामुळं महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला. गेल्या वर्षी दोन महिने वेतन उशिराने झाले, तर यंदाच्या वर्षीही वेतन प्रश्न निर्माण झाला. 

राज्य सरकारची जरी आर्थिक मदत मिळाली असली तरीही वेळेवर वेतन मिळत नसल्याने समस्या कायम आहेत. महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२० पासून ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत १२ कर्मचारी आणि मार्च २०२१ पासून ते आतापर्यंत ११ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये तर ४ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. कोल्हापूर, नागपूर, सांगली, परभणी, नाशिक, जळगाव, रत्नागिरी, लातूर विभाग, नांदेड, यवतमाळ, रायगड, सोलापूर, भंडारा, चंद्रपूर, धुळे या विभागातील एसटी कर्मचारी आहेत. यात १३ चालकांचा समावेश आहे, तर सहा वाहक, दोन साहाय्यक, एक वाहतूक नियंत्रक आणि एका लिपिकाचा समावेश आहे.

कोरोनाकाळात एसटीतील २३ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या होणे ही चिंताजनक बाब आहे. वेतन, आर्थिक समस्यांबरोबरच त्यामागील अनेक कारणे असली तरीही कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन महामंडळाच्या वतीने के ले जात आहे. कर्मचाऱ्यांना सर्वोतोपरी मदत केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा - 

मुंबईत बेस्टची बस सेवा बंद, महाराष्ट्र बंदचा परिणाम

Maharashtra Bandh : काँग्रेस, शिवसेना आणि NCPची प्रदर्शनं, भाजप, मनसेचा विरोध


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा