चिल्लर हवी आहे, या बस आगारात; बेस्टची नवी क्लपना

बेस्टकडं ५, १० रुपयांच्या नाण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दररोज नाण्याच्या संख्येत वाढ होत असल्यानं बेस्टनं ही नाणी संपुष्टात आणण्यासाठी नवीनच कल्पना आणली आहे.

SHARE

आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमानं घट झालेल्या प्रवासी संख्येत वाढ करण्यासाठी तिकीट भाडं कमी केलं. त्यानुसार, बेस्टनं किमान तिकीट ५ रुपये करण्याचा घेतला. मात्र, बेस्टच्याया निर्णयानंतर प्रवासी संख्येत वाढ झाली. परंतु, बेस्टकडं सुट्ट्या नाण्यांचा खच पडू लागला आहेमागील काही महिन्यांपासून बेस्टकडं ५, १० रुपयांच्या नाण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दररोज नाण्याच्या संख्येत वाढ होत असल्यानं बेस्टनं ही नाणी संपुष्टात आणण्यासाठी नवीनच कल्पना आणली आहे. 

सुट्ट्यांची निकड

या नव्या कल्पनेनुसार, बेस्टनं ही चिल्लर सर्व बसडेपोंमध्ये सुट्ट्यांची निकड असलेल्यांसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. सुट्ट्या पैशांमध्ये वाढ होत असल्यानं त्याचं व्यवस्थापन करणं अवघड ठरत आहे. बेस्टकडं दररोज १० ते १२ लाख रुपयांची नाणी जमा होत आहेत. त्यामुळं ही नाणी कमी करण्यासाठी बेस्टनं सुट्ट्या पैशांचे वितरण करण्यासाठी आवाहन केलं आहे.

बस आगारात व्यवस्था

बेस्टच्या या आव्हानानुसार, 'ज्यांना चिल्लर पाहीजे त्यांच्यासाठी सर्व बस आगारात व्यवस्था करण्यात आली आहे'. बेस्टच्या मुंबईतील २७ बस आगारांतील तिकीट, रोख विभागात सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेत सुट्टी नाणी आणि नोटा वितरित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचा दिवस वगळून इतर कोणत्याही दिवशी ही सुविधा उपलब्ध केल्याची माहिती बेस्टन दिली आहे.हेही वाचा -

आधी मुंबईतील खड्डे भरा; मग महाराष्ट्र घडवा! मुंबईकरांकडून आदित्य ठाकरे ट्रोल

बघा, 'असं' आहे 'बिग बॉस १३' चं प्लास्टिकमुक्त घर!संबंधित विषय
ताज्या बातम्या