Advertisement

ठाणे : आता महिलांसाठी बसमध्ये 50 टक्के सवलत सुरू

ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के मोफत प्रवास करता येणार आहे.

ठाणे : आता महिलांसाठी बसमध्ये 50  टक्के सवलत सुरू
SHARES

ठाणे महापालिकेच्या 2024-25 या वर्षाच्या अर्थसंकल्पात ठाणे आयुक्त अभिजित बांगर यांनी 60 वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली आहे.

महिलांसाठी तिकिटांमध्ये 50 टक्के सवलत आणि महिलांसाठी बसमध्ये डाव्या बाजूला जागा आरक्षित करण्याची घोषणा केली आहे. ही योजना बुधवार 13 मार्च 2024 पासून सकाळी 10:00 वाजता सुरू होईल. सॅटिस ब्रिज, ठाणे रेल्वे स्टेशन येथे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमाला शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख, माजी महापौर नरेश म्हस्के, मीनाक्षी शिंदे, परिवहन सभापती विलास जोशी, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांच्यासह परिवहन समिती सदस्य व आजी-माजी नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.

ज्येष्ठ नागरिकांसाठी 100 टक्के मोफत प्रवास, तिकिटात 50 टक्के सवलत आणि महिलांना परिवहन सेवेतील जागा या तरतुदीचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.



हेही वाचा

होळी निमित्त मध्य आणि कोकण रेल्वेच्या 112 विशेष रेल्वे फेऱ्या

उल्हासनगरमध्ये 10 वर्षांनंतर परिवहनच्या ई-बसेस सुरू

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा