Advertisement

auto rickshaw: रिक्षा चालकांची २ रुपये वाढ करण्याची मागणी


auto rickshaw: रिक्षा चालकांची २ रुपये वाढ करण्याची मागणी
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हातावर पोट असलेल्या कर्मचाऱ्यांना व नोकरदार वर्गाला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानाचा फटका बसला आहे. विशेष म्हणजे मागील ३ महिन्यांहून अधिक दिवस बंद असलेल्या वाहतूक सेवेमुळं मुंबईतील रिक्षा व टॅक्सी चालकांवर आर्थिक संकट आलं आहे. या संकटावर मात करण्यासाठी व घर पुन्हा सावरण्यासाठी यांना कठीण परिस्थितीला समोरं जावं लागतं आहे.

सध्या राज्य सरकारनं यांना दिलासा दिला असून वाहतूक सेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु, नव्यानं वाहतूक सेवा देताना या रिक्षा चालकांना सामाजिक अंतर व प्रवाशांसाठी सुरक्षा व्यवस्था करण्याकरीता अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळं मुंबईतील ऑटो रिक्षा युनियननं तात्काळ २ रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे.

मुंबईच्या ऑटो रिक्षा युनियननं या संदर्भात राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना पत्र दिलं आहे. सद्यस्थितीत, रिक्षामध्ये २ प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. रिक्षातून प्रवाशांना वाहतूक सेवा देण्यासाठी २ प्रवाशांच्यामध्ये फायबर-ग्लास बसविण्यासाठी आर्थिक खर्च येत आहे. चालक हे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करत आहेत.

मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या लॉकडाऊनमुळं अनेक रिक्षा चालक एका रात्रीत बेरोजगार झाले. त्याशिवाय मुंबईत अडीच लाखांहून अधिक रिक्षा चालक असून, त्यापैकी निम्मे स्थलांतरित कामगार रिक्षा चालवित आहेत. कोणतंही काम किंवा अन्न नसल्यानं लॉकडाउनमध्ये बहुतेकांना जीवनावश्यक वस्तूंच्या पुरततेसाठी आपल्या गावची वाट धरावी लागली आहे.

लॉकडाऊनमुळं रिक्षा चालकांच्या रोजगाराचं नुकसान झालं आहे. मुंबईत काम करणाऱ्या या स्थलांतरित कामगारांना घरी जाण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. मात्र, आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानं बरेच स्थलांतरित कामगार परत मुंबईत आले आहेत. लोकल सेवा केवळ आवश्यक कामगारांसाठी धावत आहेत.



हेही वाचा -

Amitabh Bachchan's Jalsa Bungalow ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याबाहेर रक्तपात

Vasai Virar Nalasopara Containment Zones List : 'हे' आहेत वसई, विरार, नालासोपारातील कंटेन्मेंट झोन



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा