मध्य
रेल्वेच्या (Central
Railway) प्रवाशांसाठी
एक महत्वाची बातमी आहे.
मुंबईतील
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
(CSMT)
आणि
भायखळा (Byculla)
स्थानकातील
पादचारी पूल (FOB)
बंद
ठेवण्यात येणार आहेत.
दुरुस्तीच्या
कामासाठी हे पूल (Bridge)
बंद
ठेवण्यात येणार आहेत.
भायखळा
स्थानकाती
पुलाची दुरुस्ती ७ फेब्रुवारी
ते ६ मार्चदरम्यान करण्यात
येणार आहे.
तसंच,
सीएसएमटी
पुलाची दुरुस्ती (CSMT
FOB Repair)
८
ते २५ फेब्रुवारी या कालवधीत
करण्यात येणार आहे.
भायखळा
स्थानकातील कल्याण (Kalyan)
दिशेकडील
प्लॅटफॉर्म क्रमांक १,
२,
३,
४
ला जोडणारा पादचारी पूल तब्बल
एक महिना बंद ठेवण्यात
येणार
आहे.
त्याचप्रमाणं
शुक्रवार
७ फेब्रुवारीपासून या पुलाची
दुरुस्ती सुरू होणार आहे.
२
टप्प्यांत या पुलाचं
काम करण्यात येणार आहे.
पहिल्या
टप्प्यात प्लॅटफॉर्म क्रमांक
३ आणि ४ वरील पुलाचा भाग बंद
करण्यात येणार
आहे.
दुसऱ्या
टप्प्यात प्लॅटफॉर्म क्रमांक
१ आणि २वरील पुलाच्या पायऱ्या
दुरुस्तीसाठी बंद करण्यात
येणार आहेत.
८
फेब्रुवारीपासून छत्रपती
शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)
प्लॅटफॉर्म
क्रमांक ६ आणि ७वरील पादचारी
पुलाच्या पायऱ्या दुरुस्तीसाठी
बंद ठेवण्यात येणार आहेत.
यामुळं
सीएसएमटीतील प्लॅटफॉर्म
क्रमांक १ वरील प्रवेशद्वारातून
प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना
वळसा घालून प्लॅटफॉर्म क्रमांक
६ आणि ७ वर पोहोचावे लागणार
आहे.
मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकातील (Andheri Station) गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर (Gokhke Bridge Collapes) रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी रेल्वे मार्गावरील धोकादायक पुलांची दुरूस्ती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, अनेक पूल दुरूस्तीसाठी बंद करण्यात आले आहेत. मात्र, हे पूल बंद केल्यानं प्रवाशांना अनेक समस्यांच्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे.
त्यात आता आणखी भर म्हणजे मध्य रेल्वेच्या महत्वाच्या दोन स्थानकातील पादचारी पूल बंद करण्यात आल्यानं आणखी त्रास वाढणार आहे. मात्र, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रवाशांनी मुंबई दिशेकडील पादचारी पुलाचा वापर करावा, असं आवाहन मध्य रेल्वेनं केलं आहे.
हेही वाचा -
आपल्यातील भांडण विसरा… अमृता फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
म्हाडा मंडळावरील नियुक्त्या रद्द, भाजप नेत्यांना फटका