Advertisement

'बेस्ट'चा प्रवास ठरतोय त्रासदायक

सोमवारपासून सर्वसामान्यांना बेस्ट प्रवासास मान्यता देण्यात आली. मात्र हा प्रवास प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे.

'बेस्ट'चा प्रवास ठरतोय त्रासदायक
SHARES

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं सार्वजनिक वाहतूक सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला होता. परंतु, आता हळूहळू राज्य सरकार लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत आहे. त्यानुसार, अनेक व्यवहार पुन्हा सुरू झाले असून, मुंबईतील वाहतूक सेवाही पुन्हा पूर्ण प्रवासी क्षमतेनं सुरू करण्यात आली. सोमवारपासून सर्वसामान्यांना बेस्ट प्रवासास मान्यता देण्यात आली. मात्र हा प्रवास प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे.

बेस्टनं प्रवास करण्यासाठी प्रवाशांना तासंतास रांगेत उभं राहावं लागतं आहे. कारण पूर्ण प्रवासी क्षमता प्रवासास परवानगी असली तरी ही केवळ बसूनच प्रवासाची परवानगी आहे. त्यामुळं उभ्यानं प्रवास बंद असल्यानं प्रवाशांना मोठ्या रांगेत उभं राहून वाट पाहावी लागत आहे. त्यात बस वेळेवर येत नसल्यानं आणखी त्रास होत असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे.

मुंबई लोकल ही केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच आणि सर्वसामान्यांकरीता लोकलचा प्रवास उपलब्ध नसल्यामुळं सामन्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. कारण इंधन दरवाढ आणि त्यात वाढलेली महागाई यामुळं अनेकांचं आर्थिक गणित चुकत आहे. शिवाय, महिन्याच्या खर्चात ही वाढ होतेय. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना ही लोकलचा प्रवास लवकर सुरू करावा अशी मागणी धरली आहे.



हेही वाचा - 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा