Advertisement

सर्व सामान्यांसाठी रेल्वे सुरू होण्यापूर्वी पाहा 'हे' भितीदायक चित्र

सामान्य प्रवाश्यांसाठी लोकल अद्याप सुरू झालेली नाही. असं असूनही, लोकल ट्रेनमध्ये सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उठालेला दिसत आहे.

सर्व सामान्यांसाठी रेल्वे सुरू होण्यापूर्वी पाहा 'हे' भितीदायक चित्र
SHARES

कोरोनामुळे मुंबईची लाईफलाईन सर्व सामान्यांसाठी बंद झाली. परंतु ही सेवा जून महिन्यात पुन्हा सुरू झाली. यावेळी, फक्त अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचार्‍यांनाच लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली.

परंतु आता स्थानिक कर्मचारी, खासगी सुरक्षा रक्षक, महिला आणि वकील यांनाही प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु सामान्य प्रवाश्यांसाठी लोकल अद्याप सुरू झालेली नाही. असं असूनही, लोकल ट्रेनमध्ये सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उठालेला दिसत आहे.

 पण प्रश्न असा उद्भवतो की लोकल ट्रेन जर सर्वसामान्यांसाठी सुरू झाली तर कोरोना किती वेगानं पसरू शकेल, याचा अंदाज कोणीच घेऊ शकत नाही.

मुंबईत दररोज सुमारे साडेसात लाख लोकल लोकल ट्रेननं प्रवास करतात. म्हणूनच मुंबई लोकलला मुंबईची जीवनरेखा म्हणतात. आता जेव्हा लोकल काही मोजक्या लोकांसाठीच सुरू झाली आहे, तेव्हा अशी गर्दी लोकलमध्ये दिसून येत आहे. एका सीटवर तीनपेक्षा जास्त लोक बसलेले दिसून येतात. लोक गेटवर लटकलेले देखील पाहायला मिळतात. आता जर सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू करायची असेल तर कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी सरकारनं काही कठोर पावले उचलली पाहिजेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि महापालिकेनं खबरदारीचा उपाय म्हणून चाचण्या वाढवल्या आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांना यामधून सुखरूप बाहेर काढण्यासाठी रेल्वे स्थानकात कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. रेल्वे स्थानकात परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासण्या केल्या जात आहेत.

बुधवारपासून रेल्वे स्थानकात कोरोना चाचणी करण्यास सुरूवात केली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे ३ प्रवासी बाधित आढळले. दिवसभरात ६ प्रमुख स्थानकांवर १३ हजार २५३ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. राजस्थान, दिल्ली, गोवा आणि गुजरात या ४ राज्यांतून सौराष्ट्र मेल, बिकानेर-दादर, भुज-दादर, अजमेर एक्स्प्रेस या गाड्यांमधून मुंबईत आलेल्या प्रवाशांची गुरुवारी तपासणी करण्यात आली.



हेही वाचा

कोविड पासपोर्ट म्हणजे काय? तो कसा मिळवायचा?

'त्या' रेल्वे प्रवाशांवर मध्य रेल्वेची दंडात्मक कारवाई

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा