Advertisement

बघा, ही आहेत गारेगार लोकलची वैशिष्ट्यं?


बघा, ही आहेत गारेगार लोकलची वैशिष्ट्यं?
SHARES

बहुचर्चित आणि प्रतिक्षित अशी एसी लोकल सोमवारपासून मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाली. बोरीवली ते चर्चगेट अशी पहिली एसी लोकल सोमवारी सकाळी धावली. पण ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे मुंबईची लाइफलाइन असलेल्या रेल्वेतून दररोज प्रवास करणाऱ्यांना या गारेगार प्रवासाचा अानंद लुटता अाला नाही. त्यामुळे या एसी लोकलची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली अाहे. ही थंडगार प्रवासाचा अानंद देणारी एसी लोकल नेमकी कशी अाहे? तिची वैशिष्ट्यं काय? तुमची उत्सुकता फारशी ताणून न धरता अाम्ही तुम्हाला एसी लोकलच्या वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती देत अाहोत-


एसी लोकलची वैशिष्ट्यं

- सरळ वॉल असलेला स्टेनलेस स्टीलचा कोच

- प्रवाशांच्या सुखद प्रवासासाठी एअर कंडिशन

- ताशी ११० कि.मी.चा वेग

- बाहेरचं दृश्य बघण्यासाठी मोठ्या खिडक्या

- अंदाजे 6 हजार प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतील

- पहिला आणि शेवटचा डबा महिलांसाठी राखीव

- दुसऱ्या आणि अकराव्या डब्यात 7 आसने वृद्धांसाठी राखीव

- चौथ्या आणि सातव्या डब्यात 10 आसने अपंग प्रवाशांसाठी राखीव

- आपत्कालीन परिस्थितीसाठी एमर्जन्सी बटण

- तात्काळ ट्रेन थांबवण्यासाठी वेगळं बटण



ट्रेनची क्षमता

या वातानुकूलित १२ डब्यांच्या एसी लोकलमध्ये एकावेळी ५ हजार ९६४ लोक प्रवास करू शकतात. त्यात १ हजार २८ प्रवाशी बसून तर ४ हजार ९३६ लोक उभ्याने प्रवास करू शकतात.


ऑटोमॅटिक उघडणारे दरवाजे

ही लोकल एसी असल्याने दारे ऑटोमॅटिक उघडतील आणि बंद होतील. सुरक्षेच्या दृष्टीने या एसी लोकलमध्ये विशेष सोय करण्यात आली असून सध्या यातील बऱ्याचशा डब्यांमध्ये सुरक्षारक्षक असतील. तसंच पहिल्या दिवशी महिला गार्डदेखील एसी लोकलमध्ये होत्या.


हेही वाचा - 

मुंबईकरांनो, 'जस्ट चिल'! एसी लोकल सेवेत रुजू

पहिल्याच दिवशी एसी लोकलने कमावले ६२ हजार ७४६ रुपये

मुंबईकरांनो, कन्फ्युज नका होऊ!, 'हे' आहेत एसी लोकलचे दर आणि वेळापत्रक



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा