Advertisement

बेशिस्त प्रवाशांमुळं रेल्वेचं मोठं नुकसान

काही समाजकंटक व चोरट्यांनी रेल्वेनं सुरू केलेल्या 'उत्कृष्ट' गाड्याची दैना करून टाकली आहे.

बेशिस्त प्रवाशांमुळं रेल्वेचं मोठं नुकसान
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास चांगला व सुखकर व्हावा यासाठी रेल्वे (Railway) प्रशासनाकडून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. प्रवाशांसाठी लोकलमध्ये (Local) विविध सुविधा आणण्यात येतात. महत्वाचे बदल केले जातात. प्रवास सुखाचा व्हावा यासाठी एसी लोकलची (Ac Local) सुविधा केली. तसंच, काही मेल एक्सप्रेसमध्ये वाचनालय, खाण्यापीण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, या सुविधांची कदर प्रवाशांना (Passengers) नसल्याचं अनेकदा समोर आलं आहे.

रेल्वे प्रवासी प्रवासादरम्यान पान व गुटखा खातात व लोकलमधून (Local) स्थानकांवर व रुळावर थूंकून परिसर अस्वच्छ करतात. तसंच लोकलचे दरवाजे ही थुंकून खराब करतात. त्याशिवाय स्थानकातील शौचालयांची दुरावस्था करतात. परंतु, आता काहींनी हद्दच पार केली आहे. काही समाजकंटक व चोरट्यांनी रेल्वेनं सुरू केलेल्या 'उत्कृष्ट' गाड्याची दैना करून टाकली आहे.

रेल्वेच्या ८० 'उत्कृष्ट' गाड्यांमधील स्टीलचे सुमारे ५ हजार नळ, २ हजार आरसे, ५०० सोप बॉक्स आणि ३ हजार फ्लश व्हॉल्व चोरीला गेले आहेत. लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवेत सुधारणा म्हणून ऑक्टोबर २०१८ साली रेल्वेनं ३०० 'उत्कृष्ट' गाड्यांची सुरुवात केली. त्यासाठी तब्बल ४०० कोटींचा खर्च करण्यात आला होता.

एलईडी दिवे आणि दुर्गंधीमुक्त वॉशरूम अशा वैशिष्ट्यांसह सर्व प्रकारच्या उत्कृष्ट सुविधा या गाड्यांमध्ये देण्यात आल्या होत्या. मध्य आणि पश्चिम अशा दोन्ही मार्गांवर या गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यातील सुमारे ८० गाड्यांतील अत्याधुनिक सुविधांवर चोरट्यांनी (Thief) डल्ला मारला आहे.

चक्रावून टाकणारी गोष्ट म्हणजे चोरट्यांनी टॉयलेट (Washroom) पॉटवरील कव्हरही सोडलेलं नाही. एका उत्कृष्ट गाडीसाठी रेल्वेनं जवळपास ६० लाख रुपये खर्च केले आहेत. गाडीतील एक आरसा ६०० रुपयांचा तर नळ १०८ रुपयांचा होता. चोरीच्या प्रकारामुळं मध्य रेल्वेला १५.२५ लाख रुपयांचा फटका बसला आहे. तर, पश्चिम रेल्वेचं ३८.५८ लाखांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.



हेही वाचा -

मेट्रो-३ बाधितांचं होणार पुनर्वसन

'ऑफिस ऑफ प्रॉफिट'च्या मुद्द्यावर सावंत, वायकर यांचा राजीनामा?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा