टोलनाक्यावर पुन्हा टोलवसुली सुरू...

दहिसर - हजार, पाचशेच्या नोटा व्यवहारातून बंद झाल्यानंतर सरकारनं केली होती टोलमाफीची घोषणा. मुदतवाढीनंतर अखेर टोलमाफी शुक्रवारी मध्यरात्री संपली आणि टोलवसुली सुरूही झाली. मात्र त्यामुळे वाहनचालक नाखूश आहेत. त्यातच २ हजारांच्या नोटेचे सुट्टे मिळणं कठीण होत असल्यानं वाहनचालक आणि टोलनाक्यांवरच्या कर्मचाऱ्यांत वादही होतायत. वसुली सुरू होताच टोलनाक्यांवर पुन्हा वाहनांच्या लांबलचक रांगा दिसू लागल्यायत. टोल बंद असल्यानं पैसे आणि वेळ वाचत होता. टोलचा झोल पुन्हा सुरू झाल्यानं वाहतूक कोंडीही परतलीये. त्यामुळे टोलमाफी नको, आता टोलमुक्तीच द्या अशी मागणी वाहनचालकांकडून होऊ लागलीये.

Loading Comments