Advertisement

अलिबागमध्ये पर्यटकांना दुचाकी भाड्याने घेता येणार

या योजनेनुसार नोंदणीकृत ऑपरेटरना ठराविक नियम व सुरक्षितता मानके पूर्ण केल्यानंतर तासावर किंवा दिवसावर दुचाकी पर्यटकांना व अल्पकालीन वापरकर्त्यांना भाड्याने देता येतात.

अलिबागमध्ये पर्यटकांना दुचाकी भाड्याने घेता येणार
SHARES

अलिबागला (alibag) भेट देणाऱ्या पर्यटकांना आता गोवा आणि केरळप्रमाणे स्थानिक स्तरावरील प्रवासासाठी मोटारसायकल (bike) व स्कूटर (scooty) भाड्याने घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

अलिबाग हे किनारी शहर असल्याने बरीच पाहण्यासारखी पर्यटन स्थळे येथे आहेत. तसेच शहराजवळील मुरुड-जंजिरा, रेवदंडा, काशीद बीच येथील पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात.

या ठिकाणी अलिबागहून जाण्यासाठी साधारणत: बस, रिक्षा तसेच इतर खाजगी वाहतुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र मोटारसायकल तसेच स्कूटरचा पर्याय उपलब्ध नसल्याने  ऑपरेटर्सना राज्य परिवहन विभागाने अधिकृत परवाने दिले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

परिवहन विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्र (maharashtra) राज्य परिवहन प्राधिकरणाने ऑगस्टमध्ये ‘रेन्ट अ मोटरसायकल स्कीम, 1997’ अंतर्गत दोन परवाने मंजूर केले.

या योजनेनुसार नोंदणीकृत ऑपरेटरना ठराविक नियम व सुरक्षितता मानके पूर्ण केल्यानंतर तासावर किंवा दिवसावर दुचाकी पर्यटकांना व अल्पकालीन वापरकर्त्यांना भाड्याने देता येतात.

ही योजना 1997 मध्ये सुरू झाली होती. पहिल्या दहा वर्षांत काही परवाने दिल्यानंतर, महाबळेश्वरमध्ये टॅक्सी व रिक्षाचालकांच्या विरोधामुळे सरकारने 2015 मध्ये ही योजना स्थगित केली होती. मात्र, यावर्षी जूनमध्ये राज्य सरकारने नऊ वर्षांचा निर्बंध उठवला आणि पुन्हा या योजनेला मार्ग मोकळा करून दिला.



हेही वाचा

2041 पर्यंत मुंबईची पाण्याची तहान वाढणार

नवरात्रोत्सवात महालक्ष्मी मंदिराला जाणाऱ्यांसाठी जादा बसेस धावणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा