Advertisement

2041 पर्यंत मुंबईची पाण्याची तहान वाढणार

भविष्यात या वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी पाण्याची मागणी वाढणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली.

2041 पर्यंत मुंबईची पाण्याची तहान वाढणार
SHARES

मुंबईच्या (mumbai) लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे वाढत्या लोकवस्तीत दिवसेंदिवस पाण्याच्या मागणीत वाढ होत आहे. 2041 पर्यंत मुंबई शहराची अंदाजित लोकसंख्या 17.24 दशलक्ष इतकी होण्याची शक्यता आहे.

भविष्यात या वाढत्या लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी दररोज 653 कोटी लिटर पाण्याची मागणी असणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या (brihanmumbai municipal corporation) पाणीपुरवठा विभागाने दिली.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून मुंबईच्या लोकसंख्येत (population) झपाट्याने वाढ होत आहे. ऐन उन्हाळ्यात मुंबईकराना पाणीकपातीला सामोरे जावे लागते.

2041 पर्यंत मुंबईची अंदाजित लोकसंख्या 1 कोटी 72 लाख (17.24 दशलक्ष) आणि पाण्याची मागणी (water demand) दररोज 653 कोटी लिटर (अर्थात 6,535 दशलक्ष लीटर्स) इतकी असण्याची शक्यता आहे.

भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी शासनाने मुंबईसाठी दिलेले गारगाई, पिंजाळ व दमणगंगा पिंजाळ नदी जोड प्रकल्प हे स्रोत विकसित करता येण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.

हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठ्यात प्रतिदिनी 2,891 दशलक्ष लीटर्स इतकी वाढ होणार आहे. तर महानगरपालिकेने (brihanmumbai municipal corporation) मनोरी येथे 400 द.ल.ली. प्रतिदिन पर्यंत विस्तार क्षमता असलेल्या, 200 द.ल.ली. प्रतिदिन निःक्षारीकरण प्रकल्प लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.



हेही वाचा

गारगाई धरण आणि भांडुप प्रकल्पासाठी पालिकेकडून भूखंड

नवरात्रीमध्ये मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतुकीत बदल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा