Advertisement

शनिवारी 'मरे'चा ट्रॅफिक ब्लॉक


शनिवारी 'मरे'चा ट्रॅफिक ब्लॉक
SHARES

मुबंई - मध्य रेल्वेला शनिवारी विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत. कर्जत स्थानकावर रेल्वे रुळाच्या देखभाल दुरुस्तीसाठी शनिवारी सकाळी 10.40 ते दुपारी 2.40 वाजेपर्यंत मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

ट्रॅफिक ब्लॉकमुळे प्रभावित होणारी वाहतूक

  • सीएसटीवरुन सकाळी 8.29, 9.30, 10.30 आणि 11 वाजेपर्यंत सुटणारी कर्जत लोकल केवळ भीवपुरी रोडपर्यंत चालविण्यात येणार
  • ठाण्यावरुन सकाळी 10.48 आणि दुपारी 12.11 वाजता सुटणारी कर्जत लोकल भीवपुरी रोडपर्यंत चालविण्यात येणार
  • सीएसटीवरुन सकाळी 9 वाजता सुटणारी कर्जत लोकल अंबरनाथ, तर कर्जतवरुन दुपारी 12.01 किंवा 1 वाजता सुटणारी सीएसटी लोकल भीवपुरीवरुन चालविण्यात येणार
  • कर्जतवरुन सकाळी 10.35, 12.21 आणि दुपारी 1.27 सुटणारी ठाणे लोकल भीवपुरीपर्यंत चालविण्यात येणार
  • कर्जतवरुन दुपारी 1.57 वाजता सुटणारी सीएसटी लोकल अंबरनाथवरुन चालविण्यात येणार
  • हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस (17032), चैन्नई-मुंबई एक्स्प्रेस (11042), कोयंबतूर-मुंबई एक्स्प्रेस (11014) या गाड्या मुंबईला आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 20 ते 30 मिनिटे उशीरा पोहचणार आहे.
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा