Advertisement

Traffic Updates - अमित शाहांचा मुंबई दौरा, 'या' मार्गांवरील वाहतूकीत बदल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर आहेत.

Traffic Updates - अमित शाहांचा मुंबई दौरा, 'या' मार्गांवरील वाहतूकीत बदल
SHARES

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) मुंबई दौऱ्यावर आहेत. रविवारी संध्याकाळी ते मुंबईत (Mumbai) दाखल झाले. अमित शाह यांचा मुंबई दौरा राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. शाहांच्या उपस्थितीत भाजपच्या मिशन मुंबई महापालिकेचा श्रीगणेशा होणार आहे.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याची अवघ्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यामुळे वाहतूक व्यवस्थेतही अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून (Mumbai Traffic Police) परिपत्रक काढून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

अतिमहत्वाची व्यक्तीच्या पुर्व नियोजीत भेटी दरम्यान 4 आणि 5 सप्टेंबर, 2022 रोजी काही भागांतील रस्त्यांवरील वाहतूक संथ राहील, अशी माहिती मुंबई ट्रॅफिक पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सोमवार, 5 सप्टेंबर रोजी मलबार हिल, बाबुलनाथ, केम्स कॉर्नर, हाजीअली, महालक्ष्मी रेस कोर्स, सात रस्ता, चिंचपोकळी जंक्शन आणि लालबाग परळ, लोटस जंक्शन, वरळी डेअरी, सी लिंक, लिलावती जंक्शन परिसरात वाहतूक संथ गतीनं सुरु असणार आहे.

तसेच, मलबार हिल, गिरगाव चौपाटी, मरिन लाईन्स आणि रिगल जंक्शन कुलाबा परिसरात वाहतूक संथ गतीनं सुरु राहिल. त्याचप्रमाणे मरोळ ते पवई दरम्यानच्या परिसरातही वाहतूक संथ होणार आहे.

अमित शाह सोमवारी संध्याकाळी ६ वाजता मुंबईहून दिल्लीला परतणार आहेत. त्यामुळे सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली आहे.

वाहतुकीचे अपडेट्स पाहून मुंबईकरांनी आजच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. एकनाथ शिंदे आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी म्हणजेच ५ सप्टेंबर रोजी प्रथमच मुंबई दौऱ्यावर येत आहेत.

अमित शहा गणपती पंडालमध्ये गणेश दर्शनासोबत बीएमसी निवडणुकीसंदर्भात भाजप नेत्यांची बैठकही घेणार आहेत.

‘असा’ आहे अमित शहांचा दौरा

दुपारी 12 वाजता : देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भेट. इथे भाजप पदाधिकारी बैठक आणि त्यानंतर स्नेहभोजन असेल.

दुपारी 2 वाजता : सागर बंगल्याहून वर्षा बंगल्याकडे निघणार.

दुपारी 2.15 वाजता : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी भेट.

दुपारी 3.35 वाजता : नायक चॅरिटेबल ट्रस्ट विद्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम.

संध्याकाळी 5.50 वाजता : मुंबई विमानतळावरुन दिल्लीकडे प्रयाण



हेही वाचा

मुंबई लाइव्हच्या बातमीची दखल, ई-इनव्हॉईसिंग मशीनवरच फोटो काढावे लागणार!

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा