तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

 Mumbai
तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

मुंबई - रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सुट्टीच्या दिवशी त्रास सहन करावा लागणार आहे.

पश्चिम रेल्वे

  • 25 फेब्रुवारी आणि 26 फेब्रुवारीला मुंबई सेंट्रल ते सांताक्रुझ दरम्यान जम्बो मेगाब्लॉक असणार
  • मुंबई सेंट्रल ते सांताक्रुझ दरम्यान अप आणि डाऊनवर मध्यरात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यंत दुरूस्तीचे आणि तात्रिक काम सुरू
  • मुंबई सेंट्रल ते सांताक्रुज दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील.
  • काही अप आणि डाऊन फास्ट लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हार्बर रेल्वे

  • हार्बर लाईनवर चुनाभट्टी ते सीएसटी आणि माहिम ते सीएसटी दरम्यान डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक
  • ब्लॉकदरम्यान पनवेल, बेलापूर, वाशीमार्ग धावणा-या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वे

  • कल्याण ते ठाणे दरम्यान अप मार्गावर 11.50 ते दुपारी 4.20 वाजेपर्यंत धीम्या मार्गावरील वाहतूक बंद
  • कल्याण ते ठाणे स्थानकादम्यान धीम्या मार्गावरी गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार
  • कल्याणवरून सीएसटीला जाणाऱ्या गाड्या मेगाब्लॅक दरम्यान मुलुंडपर्यंत धीम्या मार्गावर धावणार त्यानंतर जलद मार्गावर थांबणार
  • 10 मिनिटे गाड्या उशिराने पोहोचतील.
Loading Comments