Advertisement

मध्य रेल्वेच्या 'इतक्या' मेल एक्स्प्रेस चालणार एचओजी तंत्रज्ञानावर

मध्य रेल्वेनं मेल एक्स्प्रेस हेड ऑन जनरेशन (एचओजी) तंत्रज्ञानावर चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेच्या 'इतक्या' मेल एक्स्प्रेस चालणार एचओजी तंत्रज्ञानावर
SHARES

मध्य रेल्वेनं ५७ मेल एक्स्प्रेस हेड ऑन जनरेशन (एचओजी) तंत्रज्ञानावर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता एक्स्प्रेसच्या इंजिनमधून येणाऱ्या आवाजातून प्रवाशांची सुटका होणार आहे. हेड ऑन जनरेशन तंत्रज्ञानामुळं एक्स्प्रेस जनरेटर डब्यांमधून (पॉवर कार) येणारा आवाज कायमस्वरूपी बंद होणार आहे. मध्य रेल्वेमधील एक्स्प्रेस सध्या एन्ड ऑन जनरेशन (ईओजी) या तंत्रज्ञानावर धावतात.

'मध्य रेल्वेने ईओजी तंत्रज्ञानावर धावणाऱ्या ५८ एक्स्प्रेस एचओजी तंत्रज्ञानावर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी ४१ एक्स्प्रेसचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित १७ एक्स्प्रेसचे काम महिनाभरात पूर्ण करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानानुसार एक्स्प्रेसच्या पुढे व मागे जनरेटर डबे जोडण्यात येतात. एक्स्प्रेसमधील पंखे, दिवे यांना विद्युतपुरवठा या जनरेटर डब्यातून होतो. एचओजी तंत्रज्ञानामुळं थेट विद्युत तारांमधून वीजपुरवठा शक्य आहे. त्यामुळं प्रवाशांना ध्वनी आणि वायू प्रदूषणमुक्त प्रवास करता येणार आहे.

सीएसएमटी-करमाळी तेजस, मुंबई-मडगाव डबलडेकर, मुंबई-नांदेड, मुंबई-कोच्चिवेली, शताब्दी (पुणे-सिंदराबाद) या लोकप्रिय एक्स्प्रेससह गोदान, खुशीनगर, दरभंगा, आनंदवन, गोरखपूर, लखनऊ, हबीबगंज, सुलतानपूर, लष्कर, कारिकल या प्रमुख एक्स्प्रेस एचओजी तंत्रज्ञानावर मार्गस्थ होणार आहेत.

एचओजीचे फायदे

  • एचओजी तंत्रज्ञानामुळे वर्षाला एका एक्स्प्रेसमागे सुमारे ५५-६० लाखांची बचत
  • डिझेल जनरेटरच्या तुलनेत या तंत्रज्ञानाचे भांडवल, चलन किंमत, देखभाल-दुरुस्ती खर्च अत्यल्प
  • सामान्यपणे एक्स्प्रेसला दोन जनरेटर डबे जोडण्यात येतात. या तंत्रज्ञानामुळे एक डबा हटवण्यात येणार असल्याने आपत्कालीन परिस्थितीसाठी एक जनरेटर डबा राखीव
  • विजेच्या प्रतियुनिटसाठी सहा रुपये खर्च, डिझेल जनरेटरमधून वीजनिर्मितीसाठी प्रतियुनिट २२ रुपये खर्च
  • तंत्रज्ञानानुसार एक्स्प्रेसमधील प्रदूषकांचे उत्सर्जन
  • प्रदूषके एचओजी ईओजी
  • कार्बन डाय ऑक्सइड - ० - १७२४.६ टन प्रतिवर्षं
  • नायट्रोऑक्सइड - ० - ७.४८ टन प्रतिवर्ष
  • जनरेटर आवाज - आवाजमुक्त - १०० डेसिबल



हेही वाचा -

राणीच्या बागेत 'म्हातारीचा बूट', 'गेट वे ऑफ इंडिया'

वाडिया रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा