कल्याण-ठाणे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प


SHARE

कळवा येथील लेव्हल क्राॅसिंग गेट जास्त वेळ सुरु ठेवल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. गुरुवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक ठप्प झाल्यानं प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण ते ठाणे दरम्यानच्या स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.

वाहतूक ठप्प

मध्य रेल्वेच्या कळवा येथील लेव्हल क्राॅसिंग गेट जास्त वेळ सुरु ठेवण्यात आला होता. त्यामुळं एकामागो माग एक लोकल रांगेत उभ्या आहेत. त्यामुळं प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतं आहे. दरम्यान, याबाबत मध्य रेल्वेकडून अद्याप कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

दुरूस्तीचं काम

दुरूस्तीचं कामाबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, प्रवाशांचा खोळंबा होत आहे. दरम्यान, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प आणि विस्कळीत होण्याच्या घटना अनेकदा घडतात. त्यामुळं प्रवाशांना नेहमीच या मार्गावरून धक्काबुक्की सहन करत प्रवास करावा लागतो.
संबंधित विषय
ताज्या बातम्या