Advertisement

मार्चच्या पहिल्या आठवड्यात ‘मोनो’ सेवेत ?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहितेमुळे खोळंबा होऊ नये म्हणून ही सेवा लवकरत लवकर नागरिकांसाठी सुरू करण्यात येणार असल्याचं कळतं. मात्र या वृत्ताला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून दुजोरा देण्यात आलेला नाही.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात ‘मोनो’ सेवेत ?
SHARES

मुंबईची वेगळी ओळख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोनोचा दुसरा टप्पा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसऱ्या टप्यात वडाळा ते महालक्ष्मी इथल्या संत गाडगे महाराज चौकदरम्यान मोनोरेल धावणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आचारसंहितेमुळे खोळंबा होऊ नये म्हणून ही सेवा लवकरत लवकर नागरिकांसाठी सुरू करण्यात येणार असल्याचं कळतं. मात्र या वृत्ताला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून दुजोरा देण्यात आलेला नाही.


प्रवास वेगवान

मुंबईकरांचा प्रवास आणखी वेगवान व्हावा, या दृष्टीनं फेब्रुवारी २०१४ मध्ये वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या दरम्यान मोनो मार्ग टाकण्याचं निश्चित करण्यात आलं. त्यानंतर मोनोच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. मात्र काही अडचणींमुळे मोनो रेलचा दुसऱ्या टप्प्याचे काम अडीच वर्षापासून रखडलेले होते. डिसेंबर महिन्यात हा टप्पा सुरू होईल असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच एमएमआरडीएच्या बैठकीत दिला होता. 


एमएमआरडीए -स्कोमी वाद

मात्र तांत्रिक कारणांमुळे हा टप्पा सुरू होण्यासाठी विलंब लागला. त्यात मोनोरेल नक्की कोणी चालवायची? या मुद्द्यावरून एमएमआरडीए आणि स्कोमीमध्ये वाद निर्माण झाले होते. मात्र त्यानंतर एमएमआरडीएनं मोनो चालवण्याची जबाबदारी स्वत:कडे घेतली. दरम्यान मोनोचा दुसरा टप्पा हा पूर्ण झाला असून फेब्रुवारीच्या शेवटच्या किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात मोनोचा दुसरा टप्पा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. वडाळा ते चेंबूर या पेक्षा वडाळा ते सातरस्ता या सेवेमुळे मोनोला मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 



हेही वाचा

मुंबईची लोकल पुन्हा दहशतवाद्यांच्या रडारवर

६ विमानतळाच्या खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांच साखळी उपोषण




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा