Advertisement

मध्य रेल्वे रुग्णसेवेतही तत्पर

रुग्णांसाठी लिव्हर आणि किडनी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात तत्परतेने आणि सुरक्षितरित्या पोहोचवण्याचं काम मुंबई लोकलने केलं आहे.

मध्य रेल्वे रुग्णसेवेतही तत्पर
SHARES

रुग्णांसाठी लिव्हर आणि किडनी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात तत्परतेने आणि सुरक्षितरित्या पोहोचवण्याचं काम मुंबई लोकलने केलं आहे. गुरुवारी मुंबईच्या मध्य रेल्वेमधून ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण स्टेशनपासून दादर रेल्वे स्टेशनपर्यंत सर्वाधिक सुरक्षित पद्धतीने आणि तत्परतेने किडनी आणि लिव्हर पोहोचवण्यात आले. ह्या संपूर्ण प्रवासाला १ तास ७ मिनिटांचा अवधी लागला.

एका ब्रेन डेड रुग्णाची किडनी आणि लिव्हर कल्याणच्या एका खासगी रुग्णालयातून परळमधल्या रुग्णालयात पोहोचवण्याचं काम रेल्वेनं करुन दाखवलं आहे. या दोन्ही अवयवांच्या या वाहतुकीदरम्यान काही डॉक्टर्स, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, कल्याण आणि दादर रेल्वे स्टेशनचे स्टेशनमास्तर आणि इतर काही कर्मचारी उपस्थित होते.

सुरक्षा दलाच्या जवानांनी स्थानकावरची गर्दी हटवण्यास मदत केली. या सगळ्या कामगिरीची माहिती मध्य रेल्वेने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा